पिचडांच्या आवाहनला महाविकास आघाडीकडून केराची टोपली : 'अगस्ती'ची निवडणूक रंगणार

माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
Agasti Sahakari Sakhar Karkhana
Agasti Sahakari Sakhar KarkhanaSarkarnama
Published on
Updated on

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारी ( ता. 14 ) नामनिर्देशन अर्ज विक्रीला सुरवात झाली. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाला महाविकास आघाडीकडून केराची टोपली दाखवत इच्छुकांनी मोठ्या संख्येत उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यायस सुरवात केली आहे. ( A basket of bananas from Mahavikas Pichad to Madhukarrao Pichad's appeal: 'Agasthi' will be yours )

काल ( ता. 14 ) पहिल्याच दिवशी 44 तर आजच्या दिवशी 160 असे दोन दिवसांत 204 नामनिर्देशन अर्ज विक्री झाली आहे. आगार गटातून विकास कचरू शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्याच्याविरोधात तीन अर्ज आज दाखल झाले आहेत. पहिल्या दोन दिवसांची उच्चांकी अर्जाची विक्री पाहता अगस्तीची निवडणूक रंगतदार व तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Agasti Sahakari Sakhar Karkhana
मधुकरराव पिचड यांच्या मानसकन्येला अकोल्याचे नगराध्यक्षपद : बाळासाहेब वडजे उपाध्यक्ष

महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारी ( ता. 13 ) बैठक झाल्याचे समजते. त्यामध्ये निवडणूक महाविकास आघाडी करून लढण्याविषयी एकमत झाले. मते बीजे व ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, माकपचे जिल्हा सचिव डॉ. अजित नवले यांचा निर्णय अजून व्हायचा आहे.

Agasti Sahakari Sakhar Karkhana
वैभव पिचड म्हणाले, कामापेक्षा वैयक्तिक टीका टिपण्णी हाच त्यांचा अजेंडा...

आरपीआयची भाजपला सोडचिठ्ठी

अकोले नगरपंचायतमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपने संधी न दिल्याने नाराज झालेले व एक मोठ्या संघटनेला टाळल्याचे आरोप विरोधकाकडून झाले होते. त्यामुळे नाराज आर पी आय गट महाविकास आघाडीत सामील झाला आहे. आरपीआय गट हा माजीमंत्री पिचड यांच्या बरोबर कधीही जाणार नाही, असे आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे यांनी म्हटले आहे. अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत आर पी आय कडून विजयराव वाकचौरे हे इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे अनुसूचित जाती- जमाती मतदार संघातून आर .पी.आय चे विजयराव वाकचौरे यांना महाविकास आघाडी उमेदवारी देणार की नाही हे पाहणे औचित्याचे ठरत आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय अनुभवातून अगस्ती कारखाना ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे म्हणून बिनविरोध निवडीचे आवाहनाला केले आहे. मात्र त्यांच्या आवाहनाला महाविकास आघाडी प्रतिसाद देणार नाही. महाविकास आघाडी स्वतंत्र पॅनेल उभा करणार असल्याचे समजते.

Agasti Sahakari Sakhar Karkhana
जितेंद्र आव्हाडांनी अण्णा हजारेंना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा : म्हणाले...

तिसरी आघाडी

जेष्ठ नेते दशरथ सावंत व सेवा निवृत्त प्रशासक बी.जे.देशमुख हे तिसरी आघाडी करण्याच्या विचारात असून त्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे समजते. तरुण सभासद ही या निवडणुकीत उतरण्याची शक्यता असून त्यांच्या राजकीय प्रगल्भता असलेल्या युवक सभासदाला मतदार संधी देऊ शकतात. या निवडणुकीत माजी मंत्री पिचड, दशरथ सावंत, सीताराम गायकर, अशोक भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com