Kasba Election : जातीयवादी पक्षांना रोखण्याचा 'महाविकास'चा प्रयोग यशस्वी...

Prithviraj Chavan कराड येथील विश्रामगृहावर श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. ते देशभर पसरायला वेळ लागणार नाही.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

Karad News : पुण्यातील कसबा Kasba election निवडणुकीच्या निमित्ताने जातीयवादी पक्षांना रोखण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीचा Mahavikas Aghadi प्रयोग दिसणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी दिली.

कराड येथील विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. ते देशभर पसरायला वेळ लागणार नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा वैद्यतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आहे. काही दिवसांत त्याचा अंतिम निर्णय येऊ शकतो.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्यासाठी घाईगडबडीत शिवसेनेचे चिन्ह व पक्ष एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्या चिन्हाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. निवडणूक आयोगातील नियुक्तीच्या निवडीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले आहे. मागील शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसह पोटनिवडणुकित काय झालं ते समोर आहेच.

Prithviraj Chavan
Kasba By- Election: कसब्यातील पराभावाचं खापर भाजपने कुणावर फोडलं?

तर नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपची दुर्दशा झाली आहे. तब्बल 32 वर्षानंतर कसबा मतदारसंघ भाजपने गमावला. चिंचवडला अपक्षांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला. तेथील भाजपची मते पाहता त्यांची पिछेहाट झाली आहे. पोटनिवडणुकीचा दूरगामी परिणाम येणाऱ्या काळात दिसणार आहेत.

Prithviraj Chavan
Satara : राजघराण्यावर बोलताना थोडी तरी लाज राखा : उदयनराजेंचा राऊतांना टोला

त्यासह जातीयवादी पक्षांना रोखण्याचा 'महाविकास'चा प्रयोग यशस्वी होताना दिसतो आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत तो प्रयोग करणार आहोत. निवडणुकीत हरण्याची भीती भाजपला वाटत असल्याने भाजप निवडणूका टाळत आहेत. पालिका, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाही. तिथे प्रशासकच काम करत आहेत. निवडणुका टाळून लोकशाहीचा गळा घोटायच काम भाजपकडून सुरू आहे. त्याची कोर्टानेच दाखल घेतली पाहिजे.

Prithviraj Chavan
Shambhuraj Desai News: तर जीभ हासडून टाकू...; कोकणातील सभेनंतर शंभूराज देसाईंचा ठाकरेंना थेट इशारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com