Satara : राजघराण्यावर बोलताना थोडी तरी लाज राखा : उदयनराजेंचा राऊतांना टोला

Udayanraje Bhosale संजय राऊत यांनी पुन्हा एकदा छत्रपती घराण्याविषयी विधान केल्यानंतर आज खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला.
Udayanraje Bhosale, Sanjay Raut
Udayanraje Bhosale, Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत आहेत. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी संजय राऊत Sanjay Raut यांना लगावला.

साताऱ्यात खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्या दरम्यान छत्रपतींच्या घराण्यावर टीका केली होती. यानंतर आज खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला. उदयनराजे म्हणाले, अलिकडच्या काळात अशी विकृत लोक काहीही बडबडतात. अशा प्रकारच्या विकृती वाढतात, त्यावेळी समाजात क्लेष निर्माण करण्याचे काम केले जाते.

त्यांचा हेतू काय हे मला माहिती नाही. ही लोक व्यक्ती केंंद्रीत आहेत. त्यांनी विधान करताना मोजून, मापून, समजून विधान केले पाहिजे. त्यांना मी ओळखत नाही आणि महत्वही देत नाही. लोकशाहीत लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मांडणी केली. त्यांनी मांडणी केली नसती तर आजही राजेशाही असती. लोकशाहीच्या धर्तीवर आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.

Udayanraje Bhosale, Sanjay Raut
Satara : पैसा खाल्ला असता तर प्रोजेक्ट झाले असते का : उदयनराजेंचे प्रतिउत्तर

मागे हा आम्ही छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागत होता. राजकारण करा आणखी काही करा, प्रत्येकाने आपला पक्ष वाढावा म्हणून प्रयत्न करायला हवेत. पण, दुसऱ्यावर शिंतोडे उडवून तुम्ही फार मोठे होत नाही. ज्यांनी विधान केलं तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. या विकृत लोकाचे सत्तेत राहाणे हेच ध्येय आहे. त्यांच्या निर्लज्जपणाची हद्द झाली आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा खोचक टोला ही उदयनराजेंनी राऊतांना लगावला.

Udayanraje Bhosale, Sanjay Raut
Satara : नारळ फोड्यांची गॅंग साताऱ्यात पुन्हा सक्रिय... शिवेंद्रसिंहराजेंची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com