लोकायुक्त कायदा करा अन्यथा पायउतार व्हा : अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

राज्यात लोकायुक्त नियुक्त करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
anna hajare
anna hajareSarkarnama

अहमदनगर - राज्यात लोकायुक्त नियुक्त करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यात कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. ( Make Lokayukta law, otherwise step down: Anna Hazare again in the sanctity of the movement )

प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, राज्य सरकारने पहिले पत्र दिले होते की आम्ही लोकायुक्त कायदा करू. आता हे मुख्यमंत्री या विषयावर बोलत सुद्धा नाहीत. राज्यात सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होऊन गेली आहेत. पूर्वी लेखी म्हणत होते आम्ही हा कायदा करू आज बोलत सुद्धा नाहीत. काय घडले कोणी जादू केली. कसे बोलायचे बंद झाले या विषयी मला माहिती नाही मात्र निश्चित काहीतरी घडलं, असा टोला हजारे यांनी महाविकास आघाडीला लगावला.

anna hajare
"...तर सरकारमधून पायउतार व्हा" : महाविकास आघाडीविरोधात अण्णा हजारे पुन्हा आक्रमक

ते पुढे म्हणाले की, आता पुन्हा राज्यात मोठे आंदोलन तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात जिल्हास्तरावर बैठका सुरू झाल्या. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आज कमीत कमी 200 तालुक्यांत कमिट्या स्थापन झाल्या. आता लवकरच कमिटीच्या बैठका झाल्या. कमिट्यांची बांधणी झाली की महाराष्ट्रात 35 जिल्हे आणि एकाच वेळेला कमीत कमी 300 तालुक्यांत आम्ही आंदोलन सुरू करणार. लोकायुक्त कायदा करा अन्यथा पायउतार व्हा, असा इशार अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com