Satara Politics : जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची 'पद्धतशीर' मोर्चेबांधणी; मकरंदआबा वाढवतायत भाजपचं टेन्शन!

Makrand Patil - Jaykumar Gore | NCP Vs BJP News : सातारा जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविण्यासाठी मंत्री मकरंद पाटी यांनी चांगलेच नियोजन आखले आहे.
Makrand Patil - Jaykumar Gore
Makrand Patil - Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

NCP Vs BJP News : सातारा जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविण्यासाठी मंत्री मकरंद पाटी यांनी चांगलेच नियोजन आखले आहे. नुकताच कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे माजी नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्यामागे पाटील यांनीच पुढाकार घेतला होता. त्यापाठोपाठ माण-खटाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा पक्षप्रवेश निश्चित केला आहे.

माण खटाव मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे विद्यमान आमदार आहेत. सध्या राज्याचे ग्रामविकास मंत्रीही आहेत. त्यांच्याच मतदारसंघात मागील काही दिवसांपासून मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. अनिल देसाई यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला. त्यानंतर पाटील बंधूंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. पक्षाची सदस्य नोंदणीही सुरु आहे.

या माध्यमातून अधिकाधिका कार्यकर्त्यांना, लोकांना राष्ट्रवादीसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. द्विधा मनस्थितीत न राहता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात यापूर्वी सत्तेचा कसा फायदा झाला? किती निधी मिळाला? याची उदाहण देत यापुढील काळातही सत्तेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी इथे ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे हे तर उघड आहे.

Makrand Patil - Jaykumar Gore
Satara Politics : मकरंद पाटलांनी 40 वर्षांचा पैरा फेडला; उदयसिंह उंडाळकरांना हात देत विलासकाकांच्या ऋणातून उतराई

माण-खटाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही मोठी ताकद आहे. गतवर्षी लोकसभा निवडणुकीला धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेल्या मताधिक्क्यातून आणि तिथे प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे अशा बड्या नेत्यांची मांदियाळी असल्याने या ताकदीचा अंदाज येऊ शकतो. पण आता हीच ताकद आपल्याकडे खेचून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि भाजप अशा दोन्ही पक्षांची धडकी वाढवण्याचे नियोजन पाटील बंधू यांचे दिसून येते.

मंत्री गोरे यांची अडचण वाढणार?

देसाई हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण शरद पवार यांनी ऐनवेळी प्रभाकर घार्गे यांच्याबाजूने कौल दिला. त्यामुळे देसाई नाराज झाल्याचे बोलले जाते. आता सत्तेच्या माध्यमातून अनिल देसाई यांना पूर्ण ताकद देण्याचे आश्वासन खासदार नितीन पाटील आणि मकरंद पाटील यांनी दिले आहे. अजित पवार शनिवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी जिल्हा बँकेत पवार आणि देसाई यांची भेटही झाली. तिथेही दोघांमध्ये चर्चा झाली.

Makrand Patil - Jaykumar Gore
Satara Politics : नितीन पाटलांची गाडी सुसाट! शरद पवारांना धक्का देत बड्या नेत्याला आणले अजितदादांच्या ताफ्यात

अशात देसाई यांचे राजकारण गोरे विरोधी मानले जाते. विधानसभा निवडणुकीत प्रचारातही देसाई यांनी गोरेंवर अत्यंत कडवट शब्दात टीका केली होती. त्यामुळे आता अजित पवार यांनी अनिल देसाई यांना ताकद दिल्यास तालुक्यात दोन नेत्यांमध्ये संघर्ष बघायला मिळू शकतो. त्यामुळेच देसाई यांचा पक्षप्रवेश जयकुमार गोरे यांच्यासाठी काहीसा अडचणीचा ठरू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com