Mangalvedha Politic's : मंगळवेढ्यात भेटीचे राजकारण; नगराध्यक्षा आवताडे भेटल्या एकनाथ शिंदेंना, तर ‘तीर्थक्षेत्र’चे नेते अजितदादांच्या भेटीला!

Eknath Shinde-Ajit Pawar News : मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीनंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारांची भेट घेतल्याने स्थानिक राजकारणात नवे सत्तासमीकरण चर्चेत आले आहे.
Eknath Shinde-Ajit Pawar
Eknath Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on
  1. मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजपविरोधात विजयी ठरलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

  2. या भेटीत शहरातील विकासकामांसाठी निधीची मागणी करण्यात आली असून काही प्रमुख राष्ट्रवादी नेत्यांना या भेटीपासून दूर ठेवण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  3. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून निधीबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने मंगळवेढ्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mangalvedha, 26 December : नुकत्याच झालेल्या मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजपविरोधात विजयी झालेल्या तीर्थक्षेत्र आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या पदाधिकाऱ्यांनी मंगळवेढा शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री पवारांना निवेदन दिले. या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना वगळण्यात आले होते

दरम्यान, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनंदा आवताडे, त्यांचे पती बबनराव आवताडे, आवताडेंचे कट्टर समर्थक दिलीप सावंत आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख आबा लांडे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्या वेळीही शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत नेण्यात आले नव्हते, त्यामुळे मंगळवेढ्यात भेटीचे राजकारण रंगले आहे.

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युती विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा सामना झाला होता. त्या निवडणुकीत नगरपालिकेच्या 20 सदस्यांपैकी 9 सदस्य भाजपचे विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचेही नऊ सदस्य विजय झाले आहेत. मात्र, नगराध्यक्ष हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विजयी झाला आहे.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली होती. तसेच, मंगळवेढा शहरातील प्रश्नावर निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत उर्वरित काही प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली आहे. त्यांनीही अर्थमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे, त्यामुळे प्रलंबित प्रश्नावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे निधी मिळण्याचा मार्ग सुकर होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Eknath Shinde-Ajit Pawar
MNS leader joins Shiv Sena : राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; ऐन निवडणुकीत मनसेला मोठा धक्का!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून अभिनंदन केले. शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना मंगळवेढा शहरातील प्रलंबित महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. संतसृष्टी निर्माण करावी, भूमिगत गटाराचा प्रश्न मार्गी लावावा. प्रास्तावित बायपास मार्ग लोकवस्तीतून न नेता पर्यायी मार्गाने करण्यात यावा, या संदर्भातील मागण्या केल्या.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन देत मंगळवेढ्याच्या विकासासाठी मागणी केलेल्या प्रश्नावर निधीची तरतूद करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्या भेटीत त्यांनी शहरातील राजकीय प्रश्नावरही चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अरुण किल्लेदार, भारत नागणे, रामेश्वर मासाळ, सोमनाथ माळी, गणेश धोत्रे, प्रवीण गोवे, अनिल बोदाडे, तेजस सूर्यवंशी, प्रीती सूर्यवंशी, अश्विनी धोत्रे आदी उपस्थित होते.

Eknath Shinde-Ajit Pawar
Solapur NCP SP : दोन दिवसांपूर्वीच निलंबन मागे; पवारांच्या नेत्याचे आपल्याच शहराध्यक्षांविरोधात उपोषण

दरम्यान, शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नाताळाच्या शुभेच्छा देताना त्यावर आपला पदाचा उल्लेख करणे टाळले आहे, त्यामुळे मंगळवेढ्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

प्र.1: मंगळवेढा नगरपालिकेत कोणाची सत्ता आली आहे?
उ: तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला असून आघाडी सत्तेत आहे.

प्र.2: तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी कोणाची भेट घेतली?
उ: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

प्र.3: भेटीत मुख्य मागण्या कोणत्या होत्या?
उ: स्मारक, संतसृष्टी, भूमिगत गटार, बायपास मार्ग आणि शहर विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली.

प्र.4: या भेटीमुळे कोणती शक्यता वर्तवली जात आहे?
उ: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांमुळे मंगळवेढ्याच्या विकासासाठी निधी मिळण्याचा मार्ग सुकर होईल अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com