Manohar Sapate
Manohar SapateSarkarnama

Solapur NCP SP : दोन दिवसांपूर्वीच निलंबन मागे; पवारांच्या नेत्याचे आपल्याच शहराध्यक्षांविरोधात उपोषण

Manohar Sapate's hunger strike : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सोलापूरमध्ये पुन्हा गटबाजी उफाळली असून माजी महापौर मनोहर सपाटे यांनी शहराध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Published on
  1. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

  2. महापालिका निवडणुकीतील तिकिट वाटप प्रक्रियेत भ्रष्टाचार व पक्षविरोधी कृती होत असल्याचा आरोप सपाटे यांनी केला आहे.

  3. शरद पवार यांचा फोन आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, तसेच तिकिट वाटपातील भ्रष्टाचारावर पत्रकार परिषद घेणार असल्याचे सपाटे यांनी जाहीर केले आहे.

Solapur, 26 December : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील रुसवे फुगवे काही केल्या संपायला तयार नाहीत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई मागे घेतलेले माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आपल्याच पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांना फोन करण्यात आला आहे, त्यांचा फोन आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात येईल, असेही सपाटे यांनी म्हटले आहे.

सोलापूर (Solapur) महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. उमेदवार निश्चितीचे काम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत वाद काही केल्या मिटायला तयार नाहीत. आता माजी महापौर सपाटे यांनीच शहराध्यक्ष गादेकर यांच्या विरोधात उपोषणास्त्र उपसले आहे.

माजी महापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन दिवसांपूर्वी २४ डिसेंबर रोजी पक्षाकडून सपाटे यांच्या विरोधातील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत सपाटे यांनी आपल्या पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीची तयारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून केली जात आहे. मुलाखती घेऊन तिकिट वाटपाचे काम केले जात आहे. त्याच प्रक्रियेवर सपाटे यांनी आक्षेप घेतला आहे.

Manohar Sapate
Mohite Patil-Bhalke : भालके-मोहिते पाटील भेटीने सोलापुरात नव्या राजकीय समीकरणाची नांदी...

महेश गादेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महापालिका निवडणुकीतील तिकिट वाटपात भ्रष्टाचार केला जात आहे. तसेच पक्षविरोधी कृती केली जात आहे, असा आरोप सपाटे यांनी केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करण्यात आलेला आहे. त्यांचा निरोप आल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात येईल. सायंकाळी पाच वाजता तिकिट वाटपातील भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Manohar Sapate
BMC elections : मुंबईत जागावाटपाची कोंडी फुटली! असा असणार महायुतीचा फॉर्म्युला; बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उचलले मोठे पाऊल

प्र.1: उपोषण करणारे नेते कोण आहेत?
उ: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर मनोहर सपाटे.

प्र.2: उपोषण कुणाविरोधात सुरू आहे?
उ: पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या विरोधात उपोषण सुरू आहे.

प्र.3: सपाटेंचा मुख्य आरोप काय आहे?
उ: महापालिका निवडणुकीतील तिकिट वाटपात भ्रष्टाचार आणि पक्षविरोधी कृती होत असल्याचा आरोप आहे.

प्र.4: उपोषण कधी मागे घेतले जाईल असे सांगण्यात आले आहे?
उ: पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर उपोषण मागे घेतले जाईल असे सपाटे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com