Girish Mahajan News : मीच पाचवेळा जाऊन भेटलो, तरीही माझ्यावरच टीका; महाजनांचं जरांगेंना प्रत्युत्तर

Girish Mahajan on Manoj Jarange Patil : पंढरपूर येथे प्रसार माध्यमाशी बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Manoj Jarange, Girish Mahajan
Manoj Jarange, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Pandhrpur News : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे. सत्ताधारी मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ आश्वासन देत असल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यांनी त्यावरून सत्ताधारी व विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या अंमलबजावणीवरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरुन टीका करीत त्यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे पंढरपूर येथे प्रसार माध्यमाशी बोलताना महाजन यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Girish Mahajan News)

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसापासून माझ्यावर का टीका करत आहेत, ते मलाच कळले नाही. मी फक्त म्हणालो होतो आरक्षण हे टिकणारे घ्यावे. आम्ही द्यायचे आणि कोर्टात ते टिकायचे नाही , मग समाजाची फसवणूक होईल, हे टाळण्यासाठी मी बोललो होतो, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

माझ्या बोलण्याचा त्यांना राग आलेला दिसतोय. मी जे बोललो ते वस्तुस्थितीला धरून बोललो होतो. मीच पाचवेळा त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याशी बोलणी करीत होतो, पण एखादा शब्द एवढा धरुन ते माझ्यावरच टीका करीत असल्याचे गिरीश महाजन (Girish mahajan)यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange, Girish Mahajan
Ajit Pawar News : अजितदादांनी काठावर असलेल्या आमदारांना भरला सज्जड दम; म्हणाले, 'तर नव्यांना संधी देता येईल...'

येत्या काळात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देताना ते कोर्टात टिकणारे असावे, यासाठी एकनाथ शिंदे व फडणवीस प्रयत्न करीत आहेत. सध्या जातीजाती आणि समाज समाजात ज्या पद्धतीचे वातावरण बनले आहे. ते पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारे नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागतील, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

कोणाला भावी मुख्यमंत्री म्हणायचे हेच समजत नाही

भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा नाना पटोले यांना घातल्याचे त्यांच्या निदर्शनास आणताच मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे आहेत. काँग्रेस वेगळेच सांगत आहे. राष्ट्रवादी वेगळेच सांगत आहे. मग नेमके कोणाला भावी मुख्यमंत्री म्हणायचे, असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.

Manoj Jarange, Girish Mahajan
Shivsena News : ठाकरेंचा 'हा' संदेश घेऊन खासदार अरविंद सावंत विदर्भात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com