
Pandharpur, 31 August : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत सुरू असलेल्या उपोषणाबद्दल मोठा आरोप केला आहे. राजकीय आरक्षणासाठीच मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलनाची धडपड सुरू आहे, असा आरोप चंद्रकांतदादांनी केला आहे. तसेच, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी माध्यमाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत भाष्य केले आहे.
ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. पण, मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीबीसी आणि ईडब्ल्यूएसमधून आरक्षण दिले होते. पण, मनोज जरांगे पाटील यांना ते मान्य नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना केवळ राजकीय आरक्षण हवे आहे. त्यामुळेच त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे, असा दावाही चंद्रकांतदादांनी केला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मराठा समाजातील जवळपास 58 लाख कुणबी नोंदी शोधून त्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यात आले आहेत. मात्र, केवळ राजकीय आरक्षण मिळावे, यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एवढ्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार नाहीत. त्यांच्याशी सरकारचे शिष्टमंडळच चर्चा करणार आहे. चर्चेतून मार्ग निघाणार असेल तरच चर्चा करणे योग्य होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजाचा विचार केला आहे. मराठा समाजाचा त्यांनी कधीच तिरस्कार केलेला नाही. मराठा समाजासाठी जे काही करता येईल, ते आतापर्यंत फडणवीस यांनी केलेले आहे, असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकरांना वेठीस धरू नये, त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटील यांना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.