Amol Kolhe : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं...

Maratha Resrvation : मोहोळ येथील सभा संपल्यानंतर अमोल कोल्हे सोलापूरकडे जात होते. त्यावेळी मराठा बांधवांनी त्यांचा ताफा अडवला.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलक मनोज जरांगे आग्रही आहेत. आता शांतता रॅलीती त्यांनी 29 ऑगस्टपर्यंत सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याचे सरकारला आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

ते प्रत्येक नेत्याना मराठा आरक्षणाबाबत भूमिका विचारत आहेत. आतापर्यंत राज ठाकरे, नाना पटोले, शरद पवार Sharad Pawar यांनाही समजाने जाब विचारले आहेत. आज कार्यकर्त्यांनी खासदार आमोल कोल्हेंना अडवून जाब विचारला.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. विविध जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलक राजकीय नेत्यांना आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय, असा जाब विचारत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वाराज्य यात्रा सोलापूरात दाखल झालेली आहे. त्यासाठी आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांना मराठा समर्थकांनी अडवून आरक्षणाबाबत त्यांची भूमिकेबाबत प्रश्न केला.

मोहोळ येथील सभा संपल्यानंतर अमोल कोल्हे सोलापूरकडे जात होते. त्यावेळी मराठा बांधवांनी त्यांचा ताफा अडवला. त्यावेळी एक मराठा-लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलकांनी खासदार कोल्हेंना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न केला.

कोल्हे Amol Kolhe म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा 100 टक्के पाठिंबा आहे. माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची चांगली ओळख आहे. त्यांना माझ्या भूमिकेबाबत माहिती आहे. त्याबाबत तुम्ही मनोजदादांना विचारू शकता. तसेच, पवार साहेबांनी कालच पक्षाची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे, असे म्हणत कोल्हेंनी आंदोलकांची समजूत काढली.

Amol Kolhe
Uddhav Thackeray News : मोठी बातमी! पुन्हा ठाकरेंच्या पदरी निराशा; पक्ष अन् चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली

दरम्यान, सोलापूर दौऱ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. त्यावरून आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी धाराशिव आणि बीड येथे राज ठकारेंना घेरले होते. तसेच शरद पवारांच्या सभेतही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांचीही मराठा समाजाने कोंडी केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे करणाऱ्या नेत्यांना मराठा आंदोलक त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Amol Kolhe
Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत होणार उद्या सुनावणी; सुप्रीम कोर्ट मोठा निर्णय देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com