Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत होणार उद्या सुनावणी; सुप्रीम कोर्ट मोठा निर्णय देणार?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला असणार आहे. मंगळवारी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ncp News : राज्यातील विधानसभा निवडणुका आता लवकरच होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी याचा राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला असणार आहे. मंगळवारी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतच्या सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्हं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाने सुप्रीम कोर्टाच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याच याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरणाचीही याचवेळी सुनावणी होणार आहे. जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे व भाजपने एकत्रित येत महायुतीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे पक्ष दोन गटात विभागला गेला होता.

Sharad Pawar, Ajit Pawar
MVA News : उदगीरच्या जागेवर काँग्रेसचा डोळा; महाविकास आघाडीत रस्सीखेच

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णयही विधानसभा अध्यक्षांना घेण्याचा आदेश दिला. पण शरद पवार गट आणि ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांचा निकाल मान्य नसल्याने त्यांनी संबंधित निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आता राज्यातील विधानसभा निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी याचा निकाल लावणे सुप्रीम कोर्टासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Devendra Fadnavis: महायुतीत जागावाटपाचे अधिकार फडणवीसांना; 'या' मुद्यांच्या आधारे सुटणार जागा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com