Maratha Reservation : मंत्रिपदाची पर्वा नाही; पंढरपुरातील OBC मेळाव्यात भुजबळ गरजले...

Maratha Reservation Issue Chhagan Bhujbal Speech Pandharpur : ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांचा हल्लाबोल...
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation In Maharashtra Latest News : पंढरपुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे-पाटील यांच्यावर हल्ला चढवला. आधी लढाई ब्राह्मणांविरोधात नव्हती, तर ब्राह्मण्याविरोधात होती. आज अन्याय करणारे बदलले आहेत. जे जे आपल्यावर अन्याय करतील त्यांच्याविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. एकमुखाने बोलावे लागेल, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी भाषणाला सुरुवात केली.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Bhujbal Pandharpur Tour : अजितदादा गटातील मराठा नेत्यांना जरांगेंचा धसका; भुजबळांकडे फिरवली पाठ!

छगन भुजवळांनी यावेळी चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकरांचा इतिहास सांगितला. छोट्या छोट्या समाजातील सर्वांना सोबत घेऊन ते इंग्रजांविरोधात लढले. होळकरांना भारताचा नेपोलियन म्हटले गेले, असे भुजबळांनी सांगितले. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. पांडुरंग सगळ्यांचा आहे. सगळ्या जाती धर्मांचा आहे. भेदाभेद अमंगळ अशी साधू संतांची शिकवण आहे. निवडणुकीवेळी नेत्यांना अडवत नाही. मग आरक्षणासाठी का अडवले जाते. पांडुरंग सर्वांचा आहे. त्यामुळे त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही, असे भुजबळ म्हणाले.

फुलं उधळण्यासाठी 200 जेसीबी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतोय. मग तुम्ही कसे गरीब? असा प्रश्न भुजबळांनी जरांगेंचे नाव न घेता उपस्थित केला. तुम्हाला आरक्षण पाहिजे, तर आमचा पाठिंबा आहे. स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचे म्हणणे ओबीसीतून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. अजिबात मिळणार नाही. ओबीसीतून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, नाही म्हणजे नाही, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने नेमेलेला आयोग ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे, यावर मला शंका आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाला आणि समाजाला विरोध नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्या. पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही सुरू आहे, त्याला आमचा विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजीमहाराजांचे नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता. शिवाजी महाराजांनी मराठ्यांची सेना म्हटले नाही. तर मावळ्यांची सेना असल्याचे म्हटले होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजीमहाराजांची समाधी शोधली, असे ते बोलले. दलित, आदिवासीबांधवांसह सर्व मागास समाजांना सोबत घेऊन ओबीसींची भटक्या-विमुक्तांनी वज्रमूठ करायची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

आता मुंबईला यांची गरीब लेकरंबाळं 200 वाहने घेऊन मुंबईत गेले. उपोषणासाठी मैदान बघण्याकरिता. ते गरीब मग बाकीचे श्रीमंत आहेत का? आरक्षण गरीब आणि श्रीमंतीच्या आधारावर नाही, तर सामाजिक दृष्टीने तुम्ही मागास आहात, त्यावर आरक्षण दिले जाते. मी मंत्रिमंडळात आहे. सर्वांसमोर भूमिका मांडतो. मंत्रिपदाची मी पर्वा करीत नाही आणि आमदारकीचीही करीत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

edited by sachin fulpagare

R...

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Pandharpur Obc Melava : मंत्री बंत्री मी नंतर अगोदर ओबीसी कार्यकर्ता; छगन भुजबळांचा पंढरीतून इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com