Bhujbal Pandharpur Tour : अजितदादा गटातील मराठा नेत्यांना जरांगेंचा धसका; भुजबळांकडे फिरवली पाठ!

NCP News : पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मराठा नेता त्यांच्या स्वागताला पोहोचला नव्हता.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे ओबीसी मेळाव्याच्यानिमित्ताने पंढरपूरला आले आहेत. मात्र, अजितदादा गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा समाजातील नेत्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आमदार आणि स्थानिक नेते जातात. मात्र, सोलापुरातील मराठानेत्यांनी मनोज जरांगे-पाटील यांचा धसका घेतल्याचे मानले जात आहे. (Maratha leaders of Ajit Pawar's group back to Chhagan Bhujbal)

पंढरपुरात सध्या ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा सुरू आहे. त्या मेळाव्यासाठी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे शुक्रवारी (ता. ६) संध्याकाळी पंढरपुरात दाखल झाले होते. मात्र, पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मराठा नेता त्यांच्या स्वागताला पोहोचला नव्हता. भुजबळांच्या दौऱ्याकडे या नेत्यांनी सपशेल पाठ फिरवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Solapur Politics : ‘आंबेडकरांना महाआघाडीत घ्यावं; पण त्यांचं सर्वच ऐकलं...’ : सुशीलकुमारांचे मुद्यावर बोट

सोलापूर जिल्ह्यात अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत. त्यामध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने आणि करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे हे अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र यातील सर्वच आमदारांनी छगन भुजबळ यांच्यापासून चार हात दूर राहणे पसंत केल्याचे दिसून आले.

वास्तविक, पक्षाचा एखादा वरिष्ठ नेता ज्यावेळी जिल्ह्यात येतो, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते जातात. मात्र, भुजबळ यांची ओबीसीधार्जिणी भूमिका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांनी त्यांच्याकडे जाणे टाळल्याचे दिसून येत आहे.

Chhagan Bhujbal
Pandharpur Obc Melava : मंत्री बंत्री मी नंतर अगोदर ओबीसी कार्यकर्ता; छगन भुजबळांचा पंढरीतून इशारा

मंत्री छगन भुजबळ यांना भेटल्याची माहिती बाहेर आली तर मोठी बलामत आपल्यावर येऊ शकते. नाहक मनोज जरांगे-पाटील यांच्या निशाण्यावर आपण येऊ, हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी भुजबळ यांच्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्टपणे दिसते. काही नेत्यांनी तसा अनुभव घेतला आहे, त्यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

R...

Chhagan Bhujbal
MNS Melava : ‘आता फक्त एक पिशवी उघडली आहे, निवडणुकीवेळी ‘तो’ दारुगोळा बाहेर काढू’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com