Maratha Reservation : आरक्षणासाठी पाच दिवसांत चौथ्या आंदोलकाने आयुष्य संपवलं !

Maratha Community : मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे...
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या (ता. २४) संपत आहे. मात्र, आरक्षणासाठी युवकांचे आत्महत्या करण्याचे सत्र थांबलेले दिसत नाही. पाच दिवसांत आत्महत्या करणाऱ्या मराठा युवकांची संख्या आता पाच झाली आहे. काल (रविवारी) दहावीत शिकणारा ओमकार आनंदराव बावणे याने गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपाला या गावात हा प्रकार घडला.

काल रविवारी (ता. 22) नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगाव येथे राहणाऱ्या शुभमने मराठा आरक्षणासाठी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच कालच्याच दिवशी आणखी एका मराठा समाजाच्या तरुणाने आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Maratha Reservation News
Ajit Pawar News : 'जिथे ताकद तो मतदारसंघ आमचाच'; अजितदादा गटाने लोकसभेचे फुंकले रणशिंग

शेताकडे सोयाबीन कापणी करून आई-वडील घराकडे परतत असताना ओमकारच्या आईने विहिरीकडे नजर टाकली असता, आपल्याच मुलाची चप्पल विहिरीजवळ दिसली, त्याच वेळी आईने विहिरीत डोकावून पाहिले असता, ओमकारचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला. "माझे आई-वडील मोलमजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते, पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नाही; तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे," असे ओमकारने चिठ्ठीत लिहिलं आहे.

मुंबईतील पश्चिम द्रूतगती महामार्गावर फाशी घेत सुनील कावळे या मराठा आंदोलकाने 19 ऑक्टोबरला आत्महत्या केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कावळे यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 तारखेला जगन्नाथ पांडुरंग काळकुटे या तरुणाने मराठा आरक्षणाची मागणी करत आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

24 वर्षीय शुभम पवार या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहली. त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. एक मराठा लाख मराठा , मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे . माझे बलिदान वाया जाऊ नये, असा आशय त्या चिठ्ठीत आहे.

Maratha Reservation News
Mumbai Dance Bars : डान्स बारमालकांना कोण नाचवतेय ? सरकार की राहुल गेठे ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com