

Karad News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ५० टक्यांच्या आत आरक्षण मिळावे यासाठी येथे उद्या (सोमवारी) सातारा जिल्ह्यातील कराड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यासाठी शहरासह गावोगावी जनजागृती करुन मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह गावा-गावातील आबालवृध्द मराठा बांधव मोठ्यासंख्येने येथे दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्या सकाळी दहा वाजता येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ होईल. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल. तेथे मोर्चाचा समारोप होईल.
त्यासाठी शहरासह गावोगावी जनजागृती करुन मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह गावा-गावातील आबालवृध्द मराठा बांधव मोठ्या संख्येने येथे दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्या सकाळी दहा वाजता येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ होईल. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल. तेथे मोर्चाचा समारोप होईल.
* मोर्चा होईपर्यंत स्वयंस्फुर्तीने अन्न, पाणीत्याग करावे. * कोणत्याही समाजाविरोधात घोषणा देण्यात येवू नयेत. * व्यसन न करता मोर्चात सहभागी व्हावे. * मोर्चात कोणीही हुल्लडबाजी, धक्काबुकी करु नये. * मोर्चात ठरलेल्या घोषणाच देण्यात याव्या. * स्वयंशिस्त पाळुन स्वयंसेवक, पोलिसांनी सहकार्य करावे. * चर्च ते हेडपोस्टदरम्यान कोणत्याही घोषणा देवू नये.
येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन उद्या (सोमवारी) सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ होईल. तेथून तो आझाद चौक मार्गे चावडी चौक, तेथून कन्याशाळेसमोरुन जोतीबा मंदिरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. तेथून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा मुख्य पोस्ट कार्यालयासमोरुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास अभिवादन करुन दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात येईल.
पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी दोन पोलिस निरीक्षक यांच्यासह 18 अधिकारी, १०० पोलिस कर्मचारी, दोन सुरक्षा दलाच्या तुकड्या, वाहतुक शाखेचे ३४ कर्मचारी, साध्या वेशातील पोलिसांची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकता भासल्यास जादा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.