Karad Palika News : 'टाउन प्लॅनिंग' विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कराड पालिकेवर गाढवासह मोर्चा!

Yashwant Vikas Aghadi : पाच जणांची बदली न केल्यास पालिकेस ‘टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा यशवंत विकास आघाडीने दिला होता.
Karad Palika
Karad PalikaSarkarnama

-हेमंत पवार

सातार जिल्ह्यातील कराड येथील पालिकेत भ्रष्टाचार वाढला असून दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाईची मागणी करत पालिकेतील यशवंत विकास आघाडीने बुधवारी पालिकेवर गाढवासह मोर्चा काढला.

तसेच मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी टाऊन प्लॅनिंग (टीपी) विभागातील दोघांच्या बदलीचा प्रस्ताव पाठवला आहे. तर अन्य दोघांना तात्पुरते कार्यमुक्त केले असुन एकाची बदली करण्यात आल्याची माहिती दिल्याचे आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव(Rajendra Yadav) यांनी सांगितले. तसेच भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा यापुढेही सुरु राहणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karad Palika
Rajendra Yadav News : '..अन्यथा कराड पालिकेला टाळे ठोकणार' ; राजेंद्र यादवांचा 'अल्टिमेटम'!

कराड पालिकेत(Karad Palika) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी काल (मंगळवारी) पत्रकार परिषदेत केला होता. त्यांनी टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नागरीकांना आर्थिक फायद्यासाठी त्रास दिला जात असल्याचाही आरोप केला होता. त्यांनी आज दुपारी चार वाजेपर्यंत संबंधित विभागातील पाच जणांची बदली न केल्यास पालिकेस ‘टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली नाही, असा आरोप करुन आज दुपारी चारनंतर यादव यांनी समर्थकांसह पालिकेत गाढवासह मोर्चा काढला.

यावेळी उपस्थित समर्थकांनी काहीकाळ घोषणाबाजी केली. त्यानंतर सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास यादव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना मुख्याधिकारी खंदारे यांनी चर्चेसाठी बोलवले. त्यांच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांनी यशवंत विकास आघाडीकडून आरोप करण्यात आलेल्या दोघा अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्याचे सांगत तसे लेखी पत्र दिले. त्याचबरोबर याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी, म्हाडाचे मुख्य अभियंता यांनाही याबाबत लेखी कळविल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एकाची बदली करण्यात आली असून त्याबाबतच्या आदेशाची प्रतही देण्यात आली आहे.

Karad Palika
Adani Project News : विरोध डावलून 'अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट'चं काम सुरू; ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप!

त्याचबरोबर सक्तीच्या रजेवर पाठवत दोघा अधिकार्‍यांबाबत नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग सातारा यांच्यासह राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पुढील कार्यवाहीबाबत कळवण्यात आल्याचेही लेखी पत्र मुख्याधिकारी यांनी दिल्याचे यादव यांनी सांगितले. या बैठकीनंतर राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकार्‍यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासन व कारवाईबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत समाधानी असल्याचे सांगत आंदोलन स्थगित केले. त्याचवेही भविष्यातही हा लढा सुरूच राहणार असल्याचे यादव यांनी पुनर्रुच्चार केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com