Rajendra Yadav News : '..अन्यथा कराड पालिकेला टाळे ठोकणार' ; राजेंद्र यादवांचा 'अल्टिमेटम'!

Karad Palika News : टाऊन प्लॅनिंग विभागातील पाचही अधिकाऱ्यांची तातडीने बदलीची करण्याची मागणीही केली.
Rajendra Yadav
Rajendra YadavSarkarnama

Satara Political News : कराड नगर पालिकेतील पालिकेतील यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी नगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करत, विविध आरोप केले आहेत. शिवाय, टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास नगरपालिकेस टाळे ठोकण्याचाही इशारा दिला आहे.

'पालिकेतील लोकनियुक्त बॉडीची मुदत संपल्याने गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत प्रशासकीय कारभार सुरु आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. पालिकेतील सर्व विभागांची खातेनिहाय चौकशी करुन स्वतंत्र ऑडीट करुन नुकसानीची भरपाई संबंधिताकडून करावी.'

तसेच, टाऊन प्लॅनिंग विभागातील पाचही अधिकाऱ्यांच्या उद्या (बुधवा) दुपारी चार वाजण्यपूर्वी बदल्या कराव्या. अन्यथा, कराड पालिकेला टाळे लावण्याचा असा इशारा यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव(Rajendra Yadav) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajendra Yadav
Satara Collector : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगजबाबत सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कडक भूमिका!

सातारा(Satara) जिल्ह्यातील कराड पालिकेतील कारभाराची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक हणमंत पवार, स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, सुधीर एकांडे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

यादव म्हणाले, पालिकेतील विविध विभागातील अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारी व्यवस्था नसल्यामुळे अधिकाऱ्यांची बेदरकार वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अधिकाऱ्यांच्या बेफिकीर व मनमानी कारभाराचा सर्वसामान्य कऱ्हाडकरांना त्रास व्हायला लागला आहे. वेळेत कामे न करणे, पुर्णवेळ जागेवर नसणे, प्रचंड प्रमाणात पैशाची मागणी करणे, यामुळे कऱ्हाडकर नागरीक हैराण झाले आहेत.

पालिकेत भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. कऱ्हाडकर नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच मनस्तापाबाबत यशवंत विकास आघाडी(Yashwant Vikas Aaghadi)ने आक्रमक भूमिका घेतली आहे. कऱ्हाडकर नागरिकांना होत असलेला मनस्ताप यशवंत विकास आघाडी कदापी सहन करणार नाही. त्यासाठी आंदोलन करणे, पालिकेला टाळे लावणे हा पर्याय निवडला आहे.

Rajendra Yadav
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे मूळगावी; विश्रांती की विधानसभेच्या प्लॅनिंगसाठी..!

याद्वारे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना कऱ्हाडकरांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देणार आहोत. पालिकेतील उर्मट, बेदरकार अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी होणे आवश्यक आहे, अशी मागणी पालिकेच्या प्रशासकांकडे केली आहे. त्यांनी तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा पालिकेस टाळे लावण्यात येईल तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

काय आहेत आरोप? -

* प्रशासकामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नाही

* पालिकेच्या कारभारात विसंगतपणा आणला जातोय

* एका हेडचे पैसे दुसऱ्या हेडला वापरण्यात आले

* फिक्स डिपॉझीटच्या पावत्या मोडून काही ठेकेदारांची बिले दिले गेली

* पालिकेच्या जनरल फंडातील पैशांचे काय केले.

* पाच लाखांच्या कामाचे २५ लाख रुपयांचे इस्टिमेट करण्यात आले.

* पालिकेकडुन बोगस कामे दाखवण्यात येत आहेत.

* पालिकेच्या रेकॉर्डमधील काही कागदपत्रे गहाळ आहेत.

* बोगस इस्टीमेट करुन बोगस बिले तयार केली जात आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com