
Rupali Chakankar : अकलूजमध्ये २ डिसेंबर रोजी जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. विवाहाची चर्चा सुरु असतानाच काही तासातच जुळ्या बहिणींशी विवाह करणाऱ्या अतुल अवताडेंविरोधात काल (रविवारी) अकलूजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी भर पडली आहे.
या आगळ्यावेगळ्या विवाहाची चौकशी करुन त्यांचा अहवाल देण्याचा सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टि्वट करुन माहिती दिली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांना महिला आयोगाने हा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
"जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापूर पोलिस अधिक्षकांनी चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा," असे टि्वट चाकणकर यांनी केलं आहे.
रिंकी-पिंकी या जुळ्या बहिणींशी दोन दिवसापूर्वी अतुल अवताडे या तरुणाने लगीनगाठ बांधली आहे. दोन्ही कुटुंबियांनीही या विवाहास मान्यता दिल्यानंतर हा विवाह सोहळा पार पाडला. याप्रकरणी अतुल यांच्या विरोधात भादंविच्या कलम ४९४ अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अकलूजचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशमुख यांनी दिली आहे.
या जुळ्या बहिणींनी एकाच मुलाबरोबर लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर (Social media) मिम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. खरं तर हे लग्न पार पडले असले तरी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नव्या संसाराला सुरुवात करण्याआधीच त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याने पुन्हा एकदा या लग्नाची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.