Satara News : मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घ्या; माथाडी संघटना महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करेल : शशिकांत शिंदे

Maratha Reservation ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील निवासस्थानी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
NCP MLA Shashikant Shinde
NCP MLA Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Satara Shashikant Shinde News : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असून, या समाजातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करण्याची ताकद माथाडी कामगार आणि माथाडी संघटनांमध्ये आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील निवासस्थानी आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी पत्रकारांशी संवाद साधत मराठा आरक्षणाविषयी Maratha Reservation भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "माथाडी कामगारांचे आराध्य दैवत आमदार (कै.) अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये राज्यात सर्वप्रथम मराठा आरक्षणाची हाक दिली होती. या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी दिलेले बलिदान विसरता येणार नाही.

त्यांच्यानंतर माथाडी संघटना १९८० पासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात प्रत्येक वेळी उभा राहिलेल्या आंदोलनात माथाडी कामगारांनी आणि संघटनांनी भूमिका बजावली असून, याप्रश्नी आमची माथाडी कामगार संघटना कायम आग्रही राहिली आहे.

या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवस संप करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला होता. त्यानुसार मराठा आरक्षणाविषयी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी काल (शुक्रवार) मुंबई बाजार समितीच्या आवारात माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन केले.

NCP MLA Shashikant Shinde
मराठा आंदोलक इतके चिडले की देसाईंना बोलूच नाही दिले | Shambhuraj Desai | Satara News

पोलिसांच्या विनंतीवरून केवळ फळ आणि भाजीपाला बाजार सुरू ठेवला होता. माथाडी कामगार रस्त्यावर उतरतो, तेव्हा संपूर्ण राज्य थांबते. हे कालच्या आंदोलनातून आम्ही सरकारला दाखवून दिले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहे.

याविषयी आम्ही संधी मिळेल तेथे विधिमंडळामध्ये आणि रस्त्यावरदेखील सरकारला जाब विचारणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मागील आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांवर सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. दरम्यान, सरकारने मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले. maharashtra political news

NCP MLA Shashikant Shinde
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा

त्यावेळी दिलेली ३० दिवसांची मुदत वाढवून ४१ दिवसांवर नेण्यात आली. आता हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उभे राहत आहे." मनोज जरांगे पाटील व मराठा तरुणांच्या भवितव्यासाठी सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी,अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करण्याची ताकद माथाडी कामगार आणि माथाडी संघटनांमध्ये आहे, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

NCP MLA Shashikant Shinde
Pune Lok Sabha : धंगेकर, जोशी, शिंदेंनंतर आता माजी मंत्र्याने पुणे लोकसभेवर ठोकला दावा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com