Mathadi workers Union News : माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना भारतीय जनता पक्षामधून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देवून शेतकरी, कामगार व जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याची संधी द्यावी,अशी मागणी माथाडी कामगार व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नरेंद्र पाटलांवर मोठी जबाबदारी सोपविणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने माथाडी कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
याप्रसंगी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, माथाडी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कामगार-कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईत संह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री फडणवीस(Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
उपस्थितांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले,'नरेंद्र पाटील(Narendra Patil) हे लढवय्ये नेते आहेत. ते आजही एक पाऊल पुढे आहेत आणि उद्याही एक पाऊल पुढेच राहणार आहेत.त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्षपद असून, त्यांनी महामंडळाच्या कार्याला प्रगतीपथावर नेले आहे.'
तसेच 'निश्चितपणे त्यांचा विचार केला जाईल आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्यावतीने(BJP) आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तसेच यापुढे त्यांच्यावर याहीपेक्षा मोठी जबाबदारी सोपविली जाईल. कामगारांचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी शासन यापुढेही तत्पर राहिल' असंही फडणवीसांन यावेळी सांगितलं.
तर, नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची माहिती देवून प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार मानले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.