Narendra Patil : नरेंद्र पाटील संतापले; थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारणार जाब! काय आहे कारण?

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे मराठा समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करतोय, असे दर्शवतात आणि दुसऱ्या बाजुला कर्मचारी कमी करतात, असा आरोपही नरेंद्र पाटलांनी केला आहे.
Narendra Patil
Narendra PatilSarkarnama
Published on
Updated on

Karad Political News : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर गांभीर्याने पहात असतात. मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी 61 कर्मचारी तडकाफडकी काढून टाकले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे मराठा समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करतोय, असे दर्शवतात आणि दुसऱ्या बाजुला कर्मचारी कमी करतात. यासंदर्भात मुख्यमंत्री यांना भेटून जाब विचारणार आहे, असा इशाराच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्मचारी व्यवस्थापकीय संचालक यांनी शनिवारी आदेश काढून अचानक कमी केले आहेत. त्यावरुन अध्यक्ष पाटील संतप्त झाले आहेत.

ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या Maratha प्रत्येक प्रश्नावर गांभीर्याने बघतात. मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी कर्मचारी तडकाफडकी काढले. महामंडळाचे कामकाज हे ऑनलाईन चालते. असे असूनही व्यवस्थापकीय संचालकांनी कोणाच्या सांगण्यावरुन ते कर्मचारी कमी केले ?, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

Narendra Patil
Vidhan Sabha Election : विधानसभेचं संख्याबळ 288 वरून 276 वर; 12 जागा रिक्त!

या प्रकारानंतर संतापलेल्या नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची भेट घेणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे एकीकडे मराठा समाजाच्या बाजूने असल्याचे दर्शवतात आणि दुसरीकडे मात्र तडकाफडकी कर्मचारी कमी करतात. कर्मचारी कमी केल्यामुळे मराठा समाजाच्या लाभार्थींना त्यांना वेळेवर व्याज परतावा मिळणार नाही. कामे वेळेत होणार नाहीत, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

महामंडळाच्या लाभार्थ्यांना बँकेने कर्ज दिले नाही आणि महामंडळाचे कर्मचारी कार्यरत नसतील तर ते कर्जदार कोणाला भेटणार ? त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक यांनी केलेले कृत्य हे महामंडळाच्या विरोधात आणि प्रत्यक्षात मराठा समाजाच्या विरोधात आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून जाब विचारणार असल्याचे पाटलांनी Narendra Patil यावेळी स्पष्ट केले.

Narendra Patil
Sangli Politics : सांगली महाविकास आघाडीत ठिणगी; आधीच काँग्रेस-शरद पवार गटात धुसफूस; आता ठाकरे गटाने तेल ओतले

मुख्यमंत्री शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेवून महामंडळाचे कर्मचारी कमी केले. त्यामुळे महामंडळाच्या कामकाजाची ओरड होणार आहे. व्याज परतावा वेळेवर होणार नाही, बँकेतून कर्ज मिळणार नाहीत. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे कोणाच्या बोलवण्यावरुन महामंडळ अडचणीत आणण्याचे काम करत आहेत, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com