Mhaswad Bandh News: भिडे यांच्या निषेधार्थ म्हसवडला बंद; सर्वपक्षीयांचा 'रास्ता रोको'

Sambhaji Bhide News: भिडे यांच्या विरोधात म्हसवड शहरातुन निषेध रॅली काढण्यात आली. तसेच त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
Mhaswad Agitation
Mhaswad Agitationsarkarnama
Published on
Updated on

-सल्लाउद्दीन चोपदार

Maan News : बहुजन समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या महात्मा फुले यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी अपशब्द वापरल्याने त्यांच्या निषेधार्थ येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी म्हसवडला बंद पाळून सातारा - पंढपुर मार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन केले.

संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी भिडे यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. आज माण तालुक्यातील म्हसवड Mhaswad येथे भिडे यांच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला.

सकाळी म्हसवड येथील महात्मा फुले चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन त्यांचा जयघोष केला. तसेच भिडे यांच्या विरोधात म्हसवड शहरातुन निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

रॅली येथील बसस्थानक चौकात आली तेथे सभा झाली. यावेळी विविध फुले प्रेमींनी महात्मा फुले यांचे राष्ट्र कार्य सांगत भिडे यांचा निषेध केला. तर काहींनी भिडे यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Mhaswad Agitation
Satara Morcha News: संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा; प्रतिमेला दुग्धाभिषेक...

यावेळी कार्यकर्ते रस्त्यावरच ठाण मांडुन बसल्याने या मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली. त्यानंतर येथील पोलिस सहायक निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना निवेदन देऊन संभाजी भिडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com