Nagar: दुधाचे कोसळलेले दर अन् कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शिवसेना उध्दव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने नगर मनमाड महामार्गावर आज (शुक्रवार) रास्ता रोको आंदोलन केले. सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी केली.
नगर मनमाड महामार्ग अडवून ठाकरे गटाने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला नाही तर येत्या दहा दिवसात दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावातील घरावर जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.
दुधाला योग्य भाव द्यावा, कांदा निर्यात बंदी उठवावी, यासाठी शेतकरी संघटनांसह आता शिवसेना उद्धव ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्ग एक तासभर अडवत रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवर आणि शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.
कोरोनापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्यात जवळपास ठप्प आहे. दूध पावडर, बटरचे साठे पडून आहेत. अन्य राज्यांतून आणि डेअरींकडून असलेली मागणीही ठप्प आहे. प्रक्रिया प्रकल्पांकडून दुधाला मागणी नसल्याच्या या काळात दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होऊन दूधदर ढासळले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.