Satara News : गिरणी कामगाराने मानले शिवेंद्रसिंहराजेंचे आभार; एका दिवसात मिळाला घराचा ताबा...

Shivendraraje Bhosale शिवेंद्रसिंहराजे यांनी गिरणी कामगारांसाठी सातारा येथे दाेन जानेवारीला महामेळाव्याचे आयोजन केले होते.
Shivendraraje Bhosale, Anand Mahadik, Arvind Chavan
Shivendraraje Bhosale, Anand Mahadik, Arvind Chavansarkarnama
Published on
Updated on

Satara Shivendraraje Bhosale News : सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत, यासाठी कामगार व त्यांचे वारस यांची पात्रतानिश्चिती व कागदपत्रांची पडताळणी यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकताच गिरणी कामगारांचा महामेळावा आयोजिला होता. या मेळाव्यामुळे गिरणी कामगारांचा घराचा प्रश्न निकाली निघाला आहे. कुसवडे येथील एका गिरणी कामगाराला एका दिवसात घराचा ताबा मिळाला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale यांनी गिरणी कामगारांसाठी सातारा Satara येथे दाेन जानेवारीला महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सातारा जिल्ह्यासह सांगली येथूनही कामगार आणि वारस असे हजारो लोक सहभागी झाले होते. मेळाव्यात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, तसेच अर्ज भरण्यासाठी जागेवरच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

या मेळाव्याला कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांच्यासह म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला कुसवडे (ता. सातारा) येथील गिरणी कामगार आनंदराव भगवान महाडिक हेसुद्धा आपला घराचा प्रश्न सुटावा, यासाठी आले होते. बॉम्बे डाईंग कंपनीचे गिरणी कामगार असलेल्या महाडिक यांना २०१९ ला सोडतीने घर लागले होते, मात्र त्यांना घराचा ताबा अद्यापही मिळालेला नव्हता.

याबाबत महाडिक यांनी मेळाव्याच्या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी तत्काळ आमदार राणे व म्हाडाचे अधिकारी महाजन यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. शिवेंद्रसिंहराजे आणि आमदार राणे यांच्या सूचनेनुसार महाजन यांनी कागदपत्रांची छाननी करून महाडिक यांना मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी घराचा ताबा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसे ताबा पत्र आणि घराची चावीही महाडिक यांना देण्यात आली. घराचा प्रश्न सुटल्याने महाडिक कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. महाडिक यांनी लगेच शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेऊन घर मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Edited By : Umesh Bambare

R...

Shivendraraje Bhosale, Anand Mahadik, Arvind Chavan
Satara NCP : जे गेलेत त्यांची चिंता करू नका..! बालेकिल्ला टिकवण्याचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांच्या हातात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com