MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष लोकशाही बळकट होणारा निर्णय घेतील; दीपक केसरकरांचा विश्वास

Rahul Narwekar News : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात १४ सप्टेंबरला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत.
Rahul Narwekar, Deepak Kesarkar News
Rahul Narwekar, Deepak Kesarkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात १४ सप्टेंबरला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दोन वकील देण्यात आले आहेत. ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि असिम सरोदे हे बाजू मांडणार आहेत. त्यावरून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला.

केसरकर कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रडीचा डाव खेळण्यात माहीर आहेत. विधानसभेच्या बाहेर जे घडले त्या संदर्भात, अपात्रतेच्या तरतुदी लागू होत नाहीत, हे माहीत असताना त्यांनी १६ आमदारांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्याचा नेहमी विजय होतो. पण प्रत्येक मोठ्या माणसाने आपल्या इगोला वेसन घातली पाहिजे. आम्हाला भाजपने फोडलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Narwekar, Deepak Kesarkar News
Raver Congress News : देशातील हवा बदलली; २०२४ मध्ये परिवर्तन होणारच!

लोकशाही बळकट होणारा निर्णय होईल, अध्यक्षाच्या पातळीवर हा विषय संपणार नाही. हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाईल, असे केसरकर म्हणाले. कोल्हापुरात शिंदे गट आणि राष्ट्रवादीत सुरू असलेल्या धुसफूसवरून केसरकर यांनी प्रत्येक घरात थोडीशी धुसफूस असतेच, विशेषतः नवा घरोबा झाला की, काही कुरबुरी होत असतातच. ही धुसफूस लवकरच संपेल. मी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राधानगरी धरणात बोटिंग सुरू होणार

पर्यटनाला चालना मिळावी म्हणून राधानगरी धरणात बोटिंगला परवानगी दिली जाणार आहे. गोव्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे. गोव्याला आलेले पर्यटक कोल्हापूरपर्यंत यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अंबाबाई विकास आराखड्याला गती देऊन काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना केसरकर म्हणाले, बोलून मोकळे व्हायचे म्हणजे. आपण निर्णय घेऊन मोकळं व्हायचे. दुसरीकडे पूर्वी फडणवीस यांनी दिलेले आरक्षण 14 महिने टिकले. मात्र, ठाकरे सरकार आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडू शकलेले नाही. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. हा त्यांचा पराभव, चांगल्या कार्यकर्त्यांचा प्राण वाचविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करत आहेत. एक महिन्यात अहवाल येणार आहे. अहवाल आल्यानंतर अनेकांना कुणबी दाखले मिळतील. जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री यांच्यावर विशेष विश्वास आहे, असेही केसरकर म्हणाले.

वापरा आणि सोडून द्या हे बाळासाहेबांनी कधी केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या देशाचा अभिमान आहे. जगातील देशांच्या नेत्यांना महात्मा गांधींच्या समाधी स्थळे नेऊ शकतात. मग उद्धव ठाकरे यांनी 'इंडिया' आघाडीतील नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेले नाही ? असा सवाल त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Rahul Narwekar, Deepak Kesarkar News
Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक : अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com