Raver Congress News : देशातील हवा बदलली; २०२४ मध्ये परिवर्तन होणारच!

By-election results given a Message that the country isin mood of change-काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, पोटनिवडणुकांचा निकाल पाहता भाजपला लोक कंटाळल्याचे दिसते
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

Balasaheb Thorat News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष झाले. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप सावदा येथे झाला. या वेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे, असा दावा केला. (If opposition unity will remain BJP government will definatly defeat)

देशातील विरोधी पक्षांत (Congress) एकजूट राहिल्यास महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात परिवर्तन होईल. त्यात भाजपला (BJP) लोक कंटाळले आहेत. त्यामुळे केंद्रातील सरकारचा पराभव होईल.

Balasaheb Thorat
Niphad Maratha News : जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी सरणावर बसून उपोषण

सावदा येथे आयोजित काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप व बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील हवा बदलली असल्याचे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांवरून दिसून आले आहे. आता येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्तेच महत्त्वाचे असून, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. सर्वांनी एकजुटीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास राज्यात आणि देशातही परिवर्तन होईल.

ते पुढे म्हणाले, की महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या बलिदानातून काँग्रेसने मोठा त्याग केला आहे. रावेर-यावल तालुक्याला स्वातंत्र्यसैनिक धनाजीनाना चौधरी, ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी, जे. टी. महाजन यांची मोठी परंपरा आहे. देशात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे, मोठी संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर मतदारांशी संवाद साधून सहकार्य करावे.

Balasaheb Thorat
Madhya Pradesh Election : 'ज्या ४० जागांवर हरलो, तिथे विजय मिळवायचाच' ; भाजपने बांधला चंग !

आमदार चौधरी म्हणाले, की राज्य सरकारने काँग्रेसच्या आमदारांना विकासनिधी न देऊन अन्याय केला आहे. यामुळे विकासकामे रखडली आहेत. भारतीय जनता पक्षाकडून उघडपणे 'आमच्याकडे या, हवा तेवढा निधी उपलब्ध करून देऊ', असे सांगितले जात आहे. मात्र ज्या मतदारांनी आपल्याला काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून दिले आहे त्यांच्याशी विश्वासघात करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

Balasaheb Thorat
Nashik Shivsena News : बबनराव घोलप यांनी शिवसेनेत आपला खुंटा पक्का केला?

यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रभारी शरद अहीर, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रभाकर सोनवणे, माजी आमदार रमेश चौधरी, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष भूपेश जाधव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com