Jaykumar Gore News : महिला डॉक्टरच्या मोबाईलमधील माहिती बाहेर काढायला लावू नका, मृत्युनंतर बदनामी करण्याची संस्कृती नाही; मंत्री गोरे चाकणकरांच्या एक पाऊल पुढे

Jaykumar Gore Satara Doctor Death : मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना इशारा देत सातारा डाॅक्टर महिला आत्महत्येप्रकरणी मोबाईलमधील चॅट बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Jaykumar Gore News : फलटण येथील महिला डॉक्टरची मृत्यूनंतर बदनामी केल्याचा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर होत आहेत. अशात "महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचे सगळे रहस्य त्यांचा मोबाईल, दोन्ही संशयितांचे मोबाईल आणि इतर काही मोबाईलमध्ये आहे. पण कुणाच्या मृत्यूनंतर त्याचा अनादर करू नये, अशी आपली संस्कृती आहे. या प्रकरणाचे कोणीच राजकारण करु नये आणि मोबाईलधील वास्तव पुढे आणण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशारा देत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चाकणकर यांच्याही एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जाते. गोरे यांचा हा इशारा अप्रत्यक्षपणे रामराजे निंबाळकर व महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.

गोरे म्हणाले, मेहबूब शेख याने तपासी अधिकाऱ्याचे नाव सुचवावे. कोणत्या समितीकडून तपास करावा, हे देखील त्यांनी सुचवावे. त्याला एसआयटी म्हणावे की मेहबूब समिती म्हणावे, हेही सुचवावे. ते जी समिती सुचवतील त्या समितीकडून चौकशी करावी, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. त्यांचे समाधान होईल, त्या अधिकाऱ्याने चौकशी करावी. सत्य बाहेर येऊ द्या, वास्तव वेगळे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. ऑपरेशन कमळ ही मोहीम थांबलेली नाही. ज्या त्या वेळी योग्य नेत्यांचे पक्षप्रवेश होतील. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर जिंकेल, असा मला विश्वास आहे. माजी आमदार दिलीप माने, माढ्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाज सावंत यांचा योग्यवेळी पक्षप्रवेश होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Jaykumar Gore
CM post conflict : 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री बदलणार? राज्यातील राजकीय वातावरण तापले!

विरोधकांची मती व बुद्धी चोरीला

विरोधकांच्या सत्याच्या मोर्चावरूनही गोरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांच्या मतांची चोरी झाली नाही, तर त्यांची मती व बुद्धी चोरीला गेली आहे. त्यांना अजूनही कळेना की आपला पराभव का होत आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोलाही गोरे यांनी लगावला.

Jaykumar Gore
Farmers Loan Waiver : 'शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्यच नाही...अरे-तुरेची भाषा'; बच्चू कडू-देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत काय घडलं? मोठ्या नेत्याने सांगितली इनसाईड स्टोरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com