दूचाकीवरून गृहराज्यमंत्री पोहोचले सातारा शहर पोलिस ठाण्यात; पोलिसांची घेतली झाडाझडती

त्‍यांनी गेल्‍या पंधरा दिवसांत घडलेले गुन्‍हे आणि त्‍यातील गुन्‍हेगारांवर काय कारवाई केली, याबाबतची घेतली. माहिती घेत असतानाच त्‍यांनी पोलिस अधीक्षक, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पोलिस ठाण्‍यात आल्‍याचे मेसेज वायरलेसवरुन देण्‍यास सांगितले.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiPramod Ingale

सातारा : शासकीय लवाजमा बाजूला ठेवत आज गृहराज्‍यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारत सातारा शहर पोलिस ठाण्‍यास अचानक भेट दिली. भेटीदरम्‍यान त्‍याठिकाणी उपस्‍थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्‍यांनी विविध विषय, गुन्‍हे यांची माहिती घेत कामचुकार अधिकाऱ्यांबद्दल तीव्र शब्‍दात नाराजी व्‍यक्‍त केली. याचवेळी त्‍यांनी नगरसेवक बाळू खंदारे याच्‍यावर दाखल असणाऱ्या गुन्‍ह्‍याच्‍या तपासातील ढिलाईबाबत अधिकाऱ्यांचे कान उपटत त्‍यांच्‍यावर कारवाईचे संकेत दिले.

आज दुपारी १२ च्‍या सुमारास ग्रामीण गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई हे त्‍यांच्‍या पोवईनाका येथील कोयना दौलत या निवसास्‍थानातून दुचाकीवरुन बाहेर पडले. दरवेळी पुढेपाठीमागे असणारा शासकीय वाहनांचा ताफा जागेवरच थांबवत श्री. देसाई हे दुचाकी घेवून पोवई नाक्‍याकडे मार्गस्‍थ झाले. येथून ते पोलिस मुख्‍यालयाकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावरुन सातारा शहर पोलिस ठाण्‍यात आले. येथे आल्‍यानंतर त्‍यांनी शहर पोलिस ठाण्‍याच्‍या विविध भागांची पाहणी करत त्‍याठिकाणी चौकशी, गुन्‍ह्‍याच्‍या तपासासाठी आणलेल्‍यांची तसेच उपस्‍थित असणाऱ्या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची विचारपूस केली.

Shambhuraj Desai
मला मुख्यमंत्र्यांनी गृहखाते का दिले, शंभूराज देसाई यांनी दिले उत्तर..

यानंतर त्‍यांनी ठाणाधिकाऱ्यांच्‍या खुर्चीत ठाण मांडले. यानंतर त्‍यांनी गेल्‍या पंधरा दिवसांत घडलेले गुन्‍हे आणि त्‍यातील गुन्‍हेगारांवर काय कारवाई केली, याबाबतची घेतली. माहिती घेत असतानाच त्‍यांनी पोलिस अधीक्षक, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पोलिस ठाण्‍यात आल्‍याचे मेसेज वायरलेसवरुन देण्‍यास सांगितले. जिल्‍हा बँक निवडणुकीचे अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेसाठीच्‍या बंदोबस्‍तात वरिष्‍ठ अधिकारी गुंतल्‍याने त्‍यांनी उपस्‍थित असणाऱ्यांकडून माहिती घेत फरार नगरसेवक खंदारेच्‍या गुन्‍ह्‍याची चौकशी करत तो का सापडत नाही, याबाबतची विचारणा केली. याचवेळी त्‍यांनी गुन्‍ह्‍याचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच बोलावून घेतले. खंदारे का सापडत नाही, त्‍याच्‍या साथीदारांना जामीन कसा झाला, याबाबतचे प्रश्‍‍न विचारत त्‍याचा सविस्‍तर अहवाल देण्‍यास सांगितले.

Shambhuraj Desai
सिडको, एमएसआरडीसीकडून भू्स्खलनग्रस्तांना घरे बांधुन मिळणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

गेले काही दिवस शहर पोलिसांच्‍या कारभाराबाबत नागरीकांमध्‍ये चुकीच्‍या चर्चा सुरु असल्‍याने मला हे करावे लागत असल्‍याचे सांगत श्री. देसाई यांनी चुकीचे काम करणाऱ्यांवर मला खात्‍यांतर्गत कारवाई करावी लागेल, अशी तंबीही त्‍यांनी यावेळी दिली. एकंदरच शंभूराज देसाई यांनी घेतलेल्‍या आक्रमक पवित्र्‍यामुळे पोलिस दल हादरले असून त्‍यांना आपला चेहरमोहरा उजवळण्‍यासाठी ठोस भूमिका घेणे आवश्‍‍यक आहे.

Shambhuraj Desai
वाईतील जादूटोणा प्रकारावर गृहराज्यमंत्री देसाई यांचे आदेश; पाहा व्हिडिओ

वर्दीवर टोपी घाला

भेटीदरम्‍यान त्‍यांना शहर पोलिस ठाण्‍यातील कर्मचाऱ्यांच्‍या डोक्‍यावर शासकीय टोपी नसल्‍याचे दिसून आले. यामुळे संतापलेल्‍या श्री. देसाई यांनी वर्दीवर टोपी घालत जा, लाज वाटते का, का स्‍वत:ला हिरो समजता, अशा शब्‍दात पोलिस कर्मचाऱ्यांचे कान उपटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com