Vishal Patil : विशाल पाटलांना मंत्र्यानं दिली थेट भाजपात येण्याची ऑफर, अन् मग...; नेमकं काय घडलं?

Vishal Patil Vs Sanjaykaka Patil : विशाल पाटलांनी भाजपच्या संजयकाका पाटील यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. यातच सत्ताधारी मंत्र्यानंच विशाल पाटलांना भाजपात येण्याचं आवतण दिलं आहे.
Vishal Patil
Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : सांगलीतून 'हॅटट्रिक' करण्याची संधी पाहणाऱ्या भाजपच्या संजयकाका पाटील यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी 1 लाखांच्या मताधिक्क्यानं पराभव केला. या विजयानंतर अपक्ष खासदार असलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या 'हाता'ला पाठिंबा दिला.

यातच आता विशाल पाटील (Vishal Patil) यांना थेट मंत्र्यानं भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर विशाल पाटील यांनी लागलीच धुडकावून लावली. पण, मंत्र्यानं विशाल पाटलांना भाजपात येण्याची ऑफर दिल्यानं सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

झालं असं की गेल्या पंधरा वर्षांपासून मध्य रेल्वे प्रवासी संघटनेची हुबळी एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याची मागणी होती. या मागणीची अखेर रविवारी पूर्तता झाली. हुबळी एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी येथे थांबली.

यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी या गाडीला झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं. या कार्यक्रमात पालकमंत्री खाडे यांनी विशाल पाटील यांना भाजपात (BJP) येण्याची जाहीर ऑफर दिली.

"खासदार विशाल तुम्ही म्हणता की, सर्वांनी मला निवडून दिलं आहे. तर, मग आमच्यासोबत यायचं सोडून चुकीच्या ठिकाणी का गेला? अजूनदेखील तुमचे आमच्या सरकारमध्ये स्वागत आहे. एकत्र येऊन कमागे मार्गी लावू," असं पालकमंत्री खाडे यांनी म्हटलं.

यावर विशाल पाटलांनी विचारधारा सोडणार नसल्याचं सांगून ऑफर धुडकावून लावली. "मी माझी विचारधारा सोडणार नाही. तुम्ही मला प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करा," असं विशाल पाटलांनी म्हटलं.

Vishal Patil
Vishal Patil : "फडणवीस सरकारनं जरांगेंना त्रास दिला अन् मी खासदार झालो", विशाल पाटील असं का म्हणाले?

कोल्हापूरहून येणारी पॅसेंजर किर्लोस्करवाडीला आणू...

"किर्लोस्करवाडीला रेल्वेचा थांबा मिळाल्यानं परिसरातील प्रवाशांची मुंबईला जाण्याची सोय झाली. कोल्हापूरहून मिरजपर्यंत येणारी पॅसेंजर गाडीदेखील आपण किर्लोस्करवाडीला आणण्याचा प्रयत्न करू," असं आश्वासन पालकमंत्री खाडे यांनी दिलं.

Vishal Patil
Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला टोकाला जायला लावू नका", विशाल पाटील अन् कदमांना इशारा

प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच बैठक

"लवकरच मिरज येथे रेल्वेचे अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रवासी संघटना, शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावू," असं विशाल पाटील यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com