Tanaji Sawant News : मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, स्वीय सहायक...

Car Accident : रत्नागिरी रोडवर राजपूतवाडी जवळ अपघात, ताफ्यात रुग्णवाहिकाच नव्हती
Tanaji Sawant Car Accident
Tanaji Sawant Car Accidentsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनानंतर जोतिबाला जात असताना मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. अपघातामध्ये मंत्री सावंत यांना कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांचे स्वीय सहायक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर सावंत हे दुसऱ्या वाहनाने जोतिबा डोंगर येथे दर्शनासाठी रवाना झाले.

Tanaji Sawant Car Accident
Sunil Deodhar : ''...तर पुणे लोकसभा लढवायला मी तयार'' ; सुनील देवधरांचं सूचक विधान!

विविध कार्यक्रमासाठी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant ) हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. रविवारी (ता.२४) ते दुपारी कोल्हापूर रत्नागिरी मार्गाने जात होते. याच मार्गावर रजपूतवाडी जवळ त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. त्याच्यांच ताफ्यातील वाहनाने मंत्री सावंत हे बसलेल्या कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातानंतर ताफ्यातील वैद्यकीय पथकाने लगेच जखमीवर उपचार केले.

मंत्री तानाजी सावंत हे रविवारी सकाळी गारगोटी येथे कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले. तेथून पुढील कार्यक्रमासाठी तसेच जोतिबा डोंगराकडे रवाना झाले. मात्र, त्यांच्याच ताफ्यातीलल एक वाहनाने त्यांच्या कारला मागून धडक दिली. वैद्यकीय पथक ताफ्यात असले तरी रुग्णवाहिका नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ताफ्यात रुग्णवाहिका नसल्याने आश्चर्य

दोन महिन्या पुर्वी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यामागे रुग्णवाहिका असावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आत्ताच्या अपघातानंतर त्यांच्या ताफ्यामध्ये जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिक नसल्याने निदर्शनस आले.

(Edited By Roshan More)

Tanaji Sawant Car Accident
Devendra Fadnavis On Jarange : मनोज जरांगेंचा मुंबईत धडकण्याचा इशारा; फडणवीस म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com