Mumbai News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानतर आता येत्या 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा मोठी घोषणा त्यांनी दिली. यामुळे मराठा आरक्षण मागणीचे वादळ राज्याच्या राजधानीत धडकणार आहे. यामुळे आता सरकार सावध भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. जरांगे यांच्या नियोजित आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बचावात्मक प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करत आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात लक्ष घालून काम करत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने कामाला सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीने दुसरा अहवाल दिला आहे. तिसरा अहवालही लवकरच अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये मोठ्याप्रमाणात निजामकालीन नोंदी हैदराबादवरुन आम्ही प्राप्त करुन घेत आहोत. त्यामुळे जरांगेंनी अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये, राज्य सरकार योग्य काम करत आहे, म्हणून जरांगे आंदोलनाचा निर्णय घेणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांची शनिवारी (दि.23 ) बीडमध्ये जंगी सभा झाली. त्या सभेत त्यांनी आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती जाहीर केली. ते म्हणाले की, "सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर आम्ही मुंबईत धडकणार, असे जाहीर केले होते. पण, सरकारने 18 जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी केली. त्यामुळे आपणही 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार. तुम्ही सगळे मला भेटायला मुंबईत या, बघू सरकार कसे अडवते ते," असा खुला इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.