Abhijeet Patil : आमदार अभिजीत पाटलांनी दिला कॉरिडॉरबाधितांना हा शब्द; कॉरिडॉरसाठी जागेचा पर्यायही सुचविला

Pandharpur Corridor : पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठीची 10 कोटींची तरतूद रद्द झाल्यानंतर आंदोलन तीव्र झाले आहे. बंद आणि मोर्चानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
pandharpur corridor protest
pandharpur corridor protest sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 02 March : पंढरपूर कॉरिडॉर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंढरपूर नगरपरिषेदच्या पहिल्या अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवकांच्या विरोधानंतर नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या सूचनेनुसार कॉरिडॉरसाठी करण्यात आलेली १० कोटींची तरतूद रद्द केली होती. त्यानंतर आज कॉरिडॉर विरोधात बंद पाळून मोर्चा काढण्यात आला. आमदार अभिजीत पाटील यांनी कॉरिडॉरबाधित मोर्चेकरांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देण्याचा शब्द दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूर कॉरिडॉरकडे (Pandharpur corridor) पाहिले जाते. मात्र, विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी, स्थानिकाचा या कॉरिडॉरला विरोध आहे. त्यांनी पूर्वीपासूनच विरोध दर्शविला आहे. मात्र, प्रशासनाकडून आर्थिक तरतूद करण्याबरोबरच प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्या विरोधात आज पंढरपुरात मोर्चा काढण्यात आला.

आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी मोर्चेकरांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देण्याचा शब्दही दिला. हा कॉरिडॉर नदीच्या पलीकडे करण्याचीही सूचना केली आहे, त्यामुळे यातून कोणता व्यवहार्य तोडगा निघतो का, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

पंढरपूर कॉरिडॉर विरोधकांच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाचपेक्षा जास्त लोकांना घेऊन जाता येत नाही. पण, मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करतो आणि पाच लोकांचा समावेश आलेल्या शिष्टमंडळासाठी वेळ घेतो. कॉरिडॉर विरोधकांच्या अडचणी काय आहेत, ह्या मुख्यमंत्र्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा शब्द आमदार अभिजीत पाटील यांनी कॉरिडॉरबाधितांना दिला.

pandharpur corridor protest
Dharashiv Politic's : सावंतांना वगळून धाराशिव ZP त सत्ता समीकरण : भाजपच्या अर्चना पाटील अध्यक्ष, तर शिवसेना नेत्याची पत्नी उपाध्यक्ष?

आमदार पाटील म्हणाले, पंढरपूरमध्ये कॉरिडॉर व्हावा पण तो भीमा नदीच्या पलीकडे व्हावा. लोकांची घरे न पाडता पंढरपूरचा विकास व्हावा. विकासाला कोणाचाही विरोध नाही. मोर्चासाठी आलेल्या नागरिकांचाही विकासाला विरोध नाही.

pandharpur corridor protest
Sangli ZP : भाजपला धक्का देण्याचा राष्ट्रवादीचा ‘बी प्लॅन’: दोन सदस्य व्हीप झुगारणार, पुन्हा निवडून आणण्याची ‘या तीन’ नेत्यांवर जबाबदारी!

तुम्ही पंढरपूरसाठी ५० हजार कोटी रुपये खर्च करा. पण, घर पाडून तो करण्यापेक्षा पंढरपूर शहरात बागा तयार करा. वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा कराव्यात. वारकऱ्यांची निवासाची, भोजनाची, स्नानाची सोय करा. पंढरपूरमध्ये संतपीठ उभारण्यात यावे. करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. हा कॉरिडॉर नदीपलीकडे करावा, अशी सूचनाही आमदार पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com