MLA Anil Babar: 'आटपाडीतील राजकारण विचित्र, मला...'; आमदार बाबरांनी भरकार्यक्रमात बोलून दाखवली नाराजी

Sangli Politics : 'राजकारण असले तरी टोकाचा संघर्ष कधीच नव्हता...'
MLA Anil Babar
MLA Anil BabarSarkarnama
Published on
Updated on

अनिल कदम :

Sangli News : 'आटपाडी तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास अतिशय समृद्ध होता. राजकारण असले तरी टोकाचा संघर्ष कधीच नव्हता. मात्र, आता येथील राजकारण विचित्र होऊ लागले आहे. मलाही ते पसंत नाही. राजकारणापुरता संघर्ष ठीक, पण वैयक्तिक संघर्ष मला मान्य नाही,' अशी नाराजी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी भरकार्यक्रमात केली.

अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आमदार बाबर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील एका व्यासपीठावर आले होते. आटपाडी येथे विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार बाबर यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Anil Babar
Sambhajiraje News : संभाजीराजेंच्या खासदारकीचा मार्ग खडतर; राज्यसभेला जी अडचण झाली, तीच लोकसभेला?

गेल्या काही वर्षांत प्रथमच अनिल बाबर, अमरसिंह देशमुख व तानाजी पाटील एका व्यासपीठावर दिसले. तीनही नेत्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. माणगंगा कारखान्याच्या निवडणुकीवेळी तानाजी पाटील हे आमदार अनिल बाबर यांचे काहीच ऐकत नसल्याचा आरोप अमरसिंह देशमुख यांनी केला होता. पुन्हा एकदा त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.

आमदार बाबर म्हणाले, 'बापूसाहेब यापुढे तुम्ही सांगाल ते करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू, सध्या आटपाडीतील चित्र फार विचित्र आहे. असा संघर्ष आमच्यासारख्याला देखील पसंद नाही. पूर्वीचे राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी सोबत काम करणे गरजेचे आहे.

माझी भूमिका अशी आहे की, विकास होत आहे. पण विकास कोणासाठी करायचा ? ज्याच्यासाठी करायचा तो माणसात असला पाहिजे ? संस्कारी तालुका अशी आटपाडीची ओळख होती. आता मात्र फार संघर्ष सुरू आहे. राजकारणात जो संघर्ष करायचा असेल तो करू. पण वैयक्तिक डोकी फोडायचा संघर्ष नको,' असं ते म्हणाले.

अमरसिंह देशमुख म्हणाले, 'मागील विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही तुमच्यासोबत होतो. तुम्ही निवडणुकीवेळी हातात हात घातला. मात्र, पुढच्या प्रक्रियेत हात सोडून देता असे करून चालणार नाही. तानाजी पाटील म्हणत आहेत की, आमदार अनिल बाबर मागेल ते देतात. पण तुम्ही आम्हाला मागायची संधी कधी दिलीच नाही. आमदार जे मागतात ते देतात, मात्र त्यांचेही कधी कधी ऐकायलाही लागते. मात्र ते ऐकत नाहीत. यापुढे असे चालणार नाही, असं देशमुख म्हणाले.

शब्द देऊन न पाळणारे कोण ?

अमरसिंह देशमुख म्हणाले, आम्ही शब्द दिला की तो पाळतो. आम्ही प्रामाणिकपणे विधानसभेला काम केले. मात्र, अशीही काही मंडळी आहेत की, तुम्हाला समोर होय म्हणतात. प्रत्यक्षात काम करत नाहीत. आता हा आरोप देशमुख यांनी कोणाचे नाव न घेता केला, याची कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

MLA Anil Babar
Ram Mandir Inauguration : राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण नाकारणं हे त्यांच्या कर्माचं फळ; मंत्री सावंतांचा ठाकरेंना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com