Pandharpur News : आमदार पुत्राला मराठा समाजाने विचारला जाब; ‘तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र काढलं; समाजासाठी काय केले?

Maratha community Aggressive : मराठा समाजातील तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार पुत्र रणजित शिंदे यांना विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन न करताच माघारी जावे लागले.
Ranjeet Babanrao Shinde
Ranjeet Babanrao Shinde Sarkarnama

Pandharpur News : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील मराठा समाजाच्या तरुणांनी माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार बबन शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना ‘गावबंदी असताना तुम्ही गावात आलाच कसं’ असा जाब विचारला. शिवाय तुम्ही ओबीसीचे प्रमाणपत्र काढले, इतर मराठा समाजासाठी का प्रयत्न केले नाहीत, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी आलेल्या रणजित शिंदे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

मराठा समाज (Maratha community) आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या रोषाचा अनेक राजकीय नेत्यांना सामना करावा लागत आहे. तसाच प्रकार पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील तुंगत या गावी झाला आहे. मराठा समाजातील तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार पुत्र रणजित शिंदे (Ranjeet Shinde) यांना विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन न करताच माघारी जावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjeet Babanrao Shinde
Baramati Namo Rojgar Melava : फडणवीस अजितदादांना देणार मोठी जबाबदारी; बारामतीच्या रोजगार मेळाव्यात सूतोवाच

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष (दूध पंढरी) रणजित शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे हे तुंगत येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलक करणाऱ्यांनी शिंदे आणि काळे यांना गावच्या वेशीवर अडविले. राजकीय नेत्यांना गावबंदी असताना, तुम्ही गावात आलेच कसे, असा सवाल करून त्यांना रोखण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात रणजित शिंदे यांची एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांत मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यावेळीही मराठा समाजाच्या रोषाला शिंदे यांना तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर मराठा समाजाची शिंदे यांचे वडील आमदार बबन शिंदे यांनी माफी मागितली होती.

Ranjeet Babanrao Shinde
Baramati Namo Rojgar Melava : ...तर आमची सरकारला साथ असेल; शरद पवारांनी दिली ग्वाही

ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा रणजित शिंदे यांना विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यापासून मराठा समाजाने रोखले आहे, त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून समाजात खदखद व्यक्त होत असल्याचे या घटनेवरून दिसून आले.

Edited By : Vijay Dudhale

R

Ranjeet Babanrao Shinde
Baramati Namo Rojgar Melava : नमो महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर पवारांसह सुप्रिया सुळेंचीही हजेरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com