Maratha Reservation : मोठी बातमी! राज्यात 26 फेब्रुवारीपासूनच मराठा आरक्षण लागू; पण...

Eknath Shinde and Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधिमंडळाचं 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन झालं होतं. त्यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाला होते. त्याचे आता राजपत्र जारी झाले आहे.
Eknath Shinde, Devendra Fadanvis Maratha Reservation News
Eknath Shinde, Devendra Fadanvis Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News :

मराठा समाजासाठी ही सर्वात मोठी, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू झालं आहे. या संदर्भातील राजपत्र आणि बिंदू नामावली जारी करण्यात आलं आहे. राज्यात कालपासूनच (सोमवार) म्हणजे 26 फेब्रुवारीपासूनच मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे. सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी हे आरक्षण नाही. मात्र, कालपासून सुरू झालेल्या किंवा यापुढे सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी आरक्षण लागू झालेलं आहे. आजच्या बजेटमध्ये पोलिस भरती तसेच अंगणवाडी सेविका भरतीच्या घोषणा झाल्या. आरक्षणाचा फायदा या भरती प्रक्रियेत होणार आहे.

Eknath Shinde, Devendra Fadanvis Maratha Reservation News
Manoj Jarange Patil : जरांगे यांना अनेक राजकीय नेत्यांचा सपोर्ट; संगीता वानखेडेंचं SIT चौकशीला समर्थन

मराठा समाजाला आरक्षण लागू करावं, ही मराठा समाजाची जुनी मागणी आहे. त्यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलनही सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकारने 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन (Special Assembly Session for Maratha Reservation) घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर केले. त्यानंतर काल या संदर्भातील राजपत्र आणि बिंदू नामावली जारी करण्यात आली.

हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) नवीन भरतीसाठी आणि 26 फेब्रुवारीपासून लागू झालं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केला होता.

यामध्ये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस केली होती. नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण द्यावे, असे मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नमूद केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक विधिमंडळानं मंजूर केल्यानंतरही मनोज जरांगे-पाटील नाराज होते. हे 10 टक्के आरक्षण मान्य नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळी दिली होती. राज्य सरकारने 'सगेसोयरे'ची काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हीच आमची मागणी होती. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण द्या, अशी मागणी आमची नव्हतीच, असं म्हणत जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवले होते.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Devendra Fadanvis Maratha Reservation News
Maratha Reservation : अंतरवालीतील उपोषणाचा मंडप हटवण्यासाठी मोठ्या हालचाली; जरांगे पाटलांनी फोन करताच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com