Dilip Sopal : सोपलांचे राऊतांना खुले चॅलेंज; ‘तुम्ही सहकारमंत्र्यांकडे जा, आम्हीसुद्धा तुमचं भरपूर मटेरियल गोळा करून बसलोय’

Barshi Political News : जसे तुम्ही जाणार आहात, तसं आम्हीही जाणारच आहे. आम्ही काय सोडणार नाही, आमच्याकडेही माहिती आलेली आहे. त्यामुळे ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
Dilip Sopal-Rajendra Raut
Dilip Sopal-Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 August : बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या आठवड्यात आर्यन शुगर कारखान्यातील साखर विक्रीच्या घोटाळ्यावरून नाव न घेता आमदार दिलीप सोपल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्याला आमदार दिलीप सोपल यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक उत्तर दिले. तुम्ही सहकार मंत्र्यांकडे जाणार आहे, तर जा ना बाबा...तुम्हाला कोणी अडवलंय, कोणाकडे जायला. आम्हीसुद्धा तुमचं भरपूर मटेरियल गोळा करून बसलोय, असा सूचक इशारा नाव न घेता सोपलांनीही राऊतांना दिला आहे, त्यामुळे बार्शीचा राजकीय आखाडा चांगला तापल्याचे दिसून येते.

आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) पत्रकार परिषदेत म्हणाले, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बार्शी तालुक्याच्या प्रश्नासंदर्भात भेटतो. मी कोणाच्या वैयक्तीक तक्रारी करायला भेटत नाही. सभागृहातसुद्धा वैयक्तिक प्रश्नावर नव्हे; तर तालुक्याच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवतो. पण मला त्या भेटीचा गवगावा करण्याची सवय नाही.

परवा विद्वान माजी आमदाराची मुलाखत बघितली आणि आश्चर्य वाटलं. मी हायकोर्टात (High Court) जाणार आहे, मी इकडं जाणार आहे. इथं कोणी अडवलंय कोणाकडे जायला. हायकोर्टाचा काय ‘स्टे’ आहे की, तुम्ही येऊ नका, तुम्ही या म्हणून. प्रत्येक वेळी मी सहकार मंत्र्यांकडे जाणार, असं सांगितलं जातं. जा ना बाबा...तुम्हाला कोणी अडवलंय कोणाकडे जायला. आम्हीसुद्धा तुमचं भरपूर मटेरियला गोळा करून बसलोय. आम्हीसुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हायकोर्टात जाणार आहे. सगळीकडं जाणार आहे, त्यामुळे तशी चिंता करायचं कारण नाही, असे सोपल यांनी स्पष्ट केले.

सोपल म्हणाले, तुम्हाला एकट्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं दार उघडं आहे, असं नाही. ते सगळ्यांसाठी असतं. बोलता बोलता त्यांनी १४ वर्षांपूर्वीचा आर्यन शुगर संबंध नसलेला काढला आहे. विधानसभेला झालेला पराभव पचवता आला नाही; म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायला लावला. त्याची चौकशी सुरू आहे. आर्यन शुगरमधील साखर विकली आणि त्याचे पैसे भरले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

Dilip Sopal-Rajendra Raut
Shambhuraj Desai : 'हॅलोऽऽ...मी शंभूराज देसाई बोलतोय...': कलेक्टरला आलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला अन्‌ अनेक दिवसांचे पेडिंग काम मार्गी लागले! (video)

आर्यन शुगरने जेवढी साखर विकली, तेवढे पैसे भरलेले आहेत. त्याचे पुरावे आमच्याकडे आणि बॅंकेकडेही आहेत. बॅंकेचे ऑडीट प्रत्येक वर्षी होतं. एखाद्या युनिटने साखर विकली आणि पैसे भरले नाही, तर चौदा वर्षे बॅंकेचा ऑडिटर झोपलेला नसतो. हे झोपेतून जागे झालेले नवीन ऑडीटर बघायला मिळतात, तेही बिनडिग्रीचे. त्यांना नेहमी खोटं बोलण्याची आणि वागण्याची सवय लागली आहे, असा आरोप सोपलांनी राऊतांवर केला.

ते म्हणाले, विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत डोक्याला पट्टी बांधून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टात केस टाकली. पण शेवटी दूध का दूध आणि पानी का पानी झालं. असं दरवेळी ते काहीतरी खोटंनाटं आरोप करत असतात. मागच्या वेळी मतदार यादीतील नावे शोधून देणाऱ्यांचे लॅपटॉप फोडून त्यांना मारहाण केली. म्हणजे पराभव दिसत असल्यामुळे असे उद्योग करायचे आणि दुसरीकडे लक्ष वळायचे, असा त्या गृहस्थाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे.

Dilip Sopal-Rajendra Raut
Ajit Pawar : चुकीचं वागणारा सत्ताधारी असो विरोधी पक्षाचा, त्याला शिक्षा होणारच; अजितदादांच्या बीडमधील भाषणाचा रोख कुणीकडे?

बॅंक काय झोपली आहे का? बॅंकेचे चौदा वर्षे ऑडीट झालेले आहे. इतक्या कोटींचा घोटाळा.... मग ते बघून घेतील ना? मी सहकार मंत्र्यांकडे जातो. जा ना बाबा, कोणी अडवलंय. येईल त्याची तक्रार घ्यायला, सहकार मंत्री मोकळेच आहेत मुंबईत. आम्हीसुद्धा हायकोर्टात जाणार आहेात. आम्हालाही हायकोर्ट आहे ना. खोटंनाटं करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. हेही तुमच्या माध्यमातून संबंधितांना सांगतो, असेही सोपल यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com