Satara BJP News : तिन्ही पक्षाचे सरकार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा तिढा असा कसा सोडविणार, यावर भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्टच सांगितले. कऱ्हाड उत्तरमध्ये मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, वाई मतदारसंघात मदन भोसले आणि माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष असल्याचे सांगून त्यांनी उमेदवारांची नावेच जाहीर केली.
भारतीय जनता पक्षाचे BJP नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे शिरवळ, भुईंज, वाढे फाटा आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मावळते जिल्हाध्यक्ष श्री. गोरे Jaykumar Gore यांनी धैर्यशील कदम यांचे स्वागत केले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, विक्रम पावसकर, भरत पाटील, सुवर्णा पाटील, दत्ताजी थोरात, भीमराव पाटील, मनोज घोरपडे, सुरभी भोसले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तिन्ही पक्षाचे सरकार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा पेच कसा सोडविणार? असा प्रश्न जयकुमार गोरे यांना विचारला असता कऱ्हाड उत्तरमध्ये मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, वाई मतदारसंघात मदन भोसले, माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष असल्याचे सांगत जयकुमार गोरे यांनी विधानसभा व लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावाची यादीच सांगितली.
भारतीय जनता पक्ष संघटित असून, जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल, त्या उमेदवाराला निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त करून श्री. गोरे म्हणाले, सध्या तिन्ही पक्षांचे सरकार असलं, तरी जिल्ह्यात भाजपचाच विस्तार अधिक होणार आहे.
मला जिल्हाध्यक्ष असताना मिळालेले पाठबळ धैर्यशील कदम यांनाही मिळेल. पक्षाच्या योजना राबविण्यात कार्यकर्त्यांचे श्रम अधिक असून, कार्यकर्त्यांवर टाकलेली जबाबदारी ते पूर्ण करत आहेत. भाजप जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठेवण्यास ते निश्चितपणे परिश्रम करतील, तसेच जिल्हाध्यक्ष पदातून मुक्त झालो तरी कार्यकर्त्यांसाठी ठामपणे उभा आहे.’’
श्री. कदम म्हणाले, ‘‘गेल्या ३० वर्षांपासून राजकारण, समाजकारण करत आहे. जिल्ह्यात पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, ही उंची टिकविण्याचे आवाहन माझ्यासमोर आहे. गेल्या वर्षभरात भाजप- शिंदे सरकारमुळे विकासाचा वेग वाढला असून, जिल्ह्यात विकासकामांसाठी मोठा निधी दिला आहे.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.