Satara News : वैरत्व विसरले; उदयनराजेंनी दिल्या अजितदादांना शुभेच्छा...

Ajit Pawar अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना भवानी तलवार आणि वाघनख देणार असल्याचे उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.
Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Ajit Pawar, Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, असे भाजपचे खासदार उदयनराजे नेहमी उल्लेख करतात. त्याचाच प्रत्यय आज आला आहे. खासदार उदयनराजे यांनी वैरत्व विसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांनी ट्विटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी दूरध्वनी द्वारे त्यांना संपर्क करून त्यांचे स्वागत केले होते.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबके साथ सबका विकास या अंतर्गत अजित पवार हे सहभागी झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले होते. लवकरच अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना भवानी तलवार आणि वाघनख देणार असल्याचे उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.

आज राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून उदयनराजेंनी दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण यातील अजितदादांना दिलेल्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत.

Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Udayanraje News : उदयनराजे देणार अजितदादांना शुभेच्छा...फोनवरुन बोलणंही झालंय....

कारण भाजप व शिंदे गट शिवसेनेसोबत सतेत सहभागी झाल्यापासून खासदार उदयनराजे हे वैर विसरून अजित पवार याचे कौतुक करू लागले आहेत. कारण उदयनराजे म्हणतात की राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो तसाच मित्रही नसतो. ते आज अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी दाखवून दिले आहे.

उदयनराजेंनी म्हटले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी माता चरणी प्रार्थना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com