MLA Makrand Patil News : संसार जळून खाक, शेतकऱ्यासाठी आमदार मकरंद पाटील धावले!

Farmer Help : आढाळ (ता. महाबळेश्वर ) येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र हिरवे यांचे घराने रात्रीच्या वेळी अचानक पेट घेतला आमदार मकरंद पाटील यांनी आढाळ गावाला भेट दिली आणि जळीतग्रस्त कुटुंबाला आधार दिला.
Makrand Patil
Makrand Patilsarkarnama

Satara News : महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ गावात शेतकरी विठ्ठल हिरवे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत घरासोबत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. एका रात्रीत हिरवे कुटुंब रस्त्यावर आले. याची माहिती आमदार मकरंद आबा पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने हिरवे कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून गेले. हिरवे कुटुंबीयांना तातडीची 50 हजार रुपयांची मदत देवून आधार दिला.

Makrand Patil
Manoj Jarange Patil News : 'मला हलक्यात घेऊ नका, सगळ्यांचे टांगे पलटी करेन.!'; जरांगे पाटलांचा इशारा नेमका कुणाला?

आढाळ (ता. महाबळेश्वर ) येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र हिरवे यांचे घराने रात्रीच्या वेळी अचानक पेट घेतला. सारे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील सर्व लोक जिवाच्या आकांताने घरा बाहेर पडले.

ग्रामस्थ व युवकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्या आधीच घरगुती साहित्य, जीवनावश्यक साहित्य, कपडे सर्व साहित्य जळून खाक झाले. अंगावरील कपड्यानिशी हे कुटुंब घराबाहेर पडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घटनेची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील Makarand Patil यांनी आढाळ गावाला भेट दिली आणि जळीतग्रस्त कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. आमदार पाटील यांनी लगेच कुटुंबाला वैयक्तिक 50 हजार रुपयांची रोख रक्कम देवून मदतीचा हातभार दिला. तर त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सुद्धा या कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढा धान्यसाठा व इतर जीवनोपयोगी साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले.

यावेळी आमदार मकरंद पाटील यांचेबरोबर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, माजी सभापती संजय गायकवाड , रमेश चोरमले, गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार पाटील यांनी महसूल विभागाला फोन करून तातडीने पंचनामा करणेबरोबरच या बेघर झालेल्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याच्या सूचना केल्या.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com