Manoj Jarange Patil News : 'मला हलक्यात घेऊ नका, सगळ्यांचे टांगे पलटी करेन.!'; जरांगे पाटलांचा इशारा नेमका कुणाला?

Maratha Reservation : 'तुम्ही मला राज्यातून काढलं तर मी लई शहाणा आहे. इकडले मराठे तिकडल्या राज्यात बोलावून मोर्चे काढेन...'
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले होते.मराठा बांधवांसाठी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हणून ते इरेला पेटले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी कोणत्याही पक्षाला साथ न देता मराठा समाजाला तुम्हांला ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा असं आवाहन केलं होतं. तसेच आपल्या कुटुंबाला धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोपही केला होता.त्यांच्या या दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. पण आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil
Pune Accident Case : विशाल अगरवालसह आरोपीचे आजोबा अन् कार चालकाची पोलिसांकडून कसून चौकशी !

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महायुती सरकारला धारेवर धरतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे.ते म्हणाले, तुम्ही मला राज्यातून काढलं तर मी लई शहाणा आहे. इकडले मराठे तिकडल्या राज्यात बोलावून मोर्चे काढेन. जेलातले सगळे मराठे कैदी एकत्र करून मोर्चा काढीन. मात्र,समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गृहमंत्री फडणवीससाहेब, तुम्ही मला जेलमध्ये टाकाल.पण 6 कोटी मराठ्यांचं काय करणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे

यावेळी त्यांनी राजकारणात मला हलक्यात घेऊ नका. सगळ्यांची टांगे पलटी करेन. आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराच जरांगेंनी यावेळी देऊन टाकला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील म्हणाले, काही लोकांचं म्हणणं होतं,मी जातीवाद करतो आहे.त्यामुळे राज्यात मराठा-ओबीसी वाद निर्माण होत आहे.पण तुम्ही माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की, मी ओबीसींना दुखावलं.आपण कधीही गाव-खेड्यातल्या ओबीसी बांधवांना आतापर्यंत दुखावलं नाही. जातीवाद केला कुणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे अशी उलट विचारणाच यावेळी विरोधकांना केली.

त्यांनी यावेळी नाव न घेता मुंडे बंधू भगिनींवर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले, 13 तारखेच्या मतदानापर्यंत मी चांगला होतो.पण 13 तारीख पार पडली. मतदान झालं.आता पुन्हा यांची गुरगुर सुरू झाल. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही,हे षडयंत्र होतं असा आरोपही त्यांनी यावेळी केला. .

वेळ जर आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण पाडल्याशिवाय राहायचं नाही.ज्या जातीचा नेता मराठा विरोधी भूमिका घेईल त्याला निवडून येऊ द्यायचं नाही असं आवाहनही जरांगे पाटलांनी यावेळी केलं.

Manoj Jarange Patil
Pune Hit and Run Case : आरोपीच्या नातेवाईकांची पत्रकारांना अरेरावी अन् शिवीगाळ, पुण्यात वातावरण तापलं

मुंडेंवर निशाणा...

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मी प्रामाणिक समजायचो. त्यांनी कधी जातीयवाद केला नाही, मी त्यांच अनुकरण इतरांनीही करावे, असं नेहमी सांगायचो. पण, गेल्या पाच-सहा दिवसापासून त्याचं काही तरी बिघडलयं. दिवगंत गोपीनाथ मुंडेसाहेबांनी कधी जातीयवाद केला नव्हता, पण मराठा समाजाचे एवढे उपकार असताना धनंजय मुंडे समाजाविरोधात पोस्ट टाकायला लावून जातीयवाद करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरात केला.

Manoj Jarange Patil
Anna Hajare News : संजय राऊत अन् आव्हाडांनंतर आता महाविकास आघाडीचा 'हा' नेताही अण्णा हजारेंवर भडकला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com