Mangalvedha Result : मंगळवेढ्यात भाजप आमदाराला काकाने चारली धूळ; नगरपरिषदेत सत्ता, पण नगराध्यक्षपद गेले...

Nagar Parishad Election 2025 : मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे विजयी झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला असून स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.
Mangalvedha Nagar Parishad Result
Mangalvedha Nagar Parishad ResultSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 21December : मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी आवताडेंचे चुलते बबनराव आवताडे आणि भगीरथ भालके यांनी कमाल केली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे या २१२ मतांनी विजय झाल्या असून भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत 20 पैकी भाजपला आठ आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. भाजपची एक जागा बिनविरोध झाली होती, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मंगळवेढ्यात भाजपची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे.

नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहापासून निवडणूक अधिकारी मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. नगरपालिकेचा निकाल चार फेरीमध्ये जाहीर करण्यात आला. भाजपचे सोमनाथ अवताडे हे यापूर्वीच बिनविरोध झाले होते. तर मतमोजणीत भाजपला आठ आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला प्रत्येकी 9 जागा मिळाल्या आहेत. दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली, त्यामुळे नगरपालिकेत सत्ता महायुतीची आणि नगराध्यक्ष तीर्थक्षेत्र आघाडीचा असे बलाबल झाले.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि बबनराव आवताडे यांनी मोठ्या जिद्दीने ही निवडणूक लढवली. त्यांना भालके पती-पत्नीने खंबीर साथ दिल्यामुळे सुनंदा आवताडे विजयी झाल्या. प्रभाग एकमध्ये शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेले प्रा. येताळा भगत आणि प्रतिक्षा मेटकरी हे विजयी झाल्या आहेत. प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अजित जगताप यांच्या बालेकिल्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नागर गोवे व प्रमोद सावंजी विजयी झाले आहेत.

Mangalvedha Nagar Parishad Result
Indapur Nagar Parishad Result : अजितदादांना आव्हान देणाऱ्या प्रदीप गारटकरांची दत्तामामांनी पक्की जिरवली

प्रभाग तीनमध्ये विद्यागौरी अवघडे या विजयी झाल्या. प्रभाग चारमधून उपनगरात चंद्रकांत घुले पुन्हा विजयी झाले असून सोबत विजया गुंगे यांनीही बाजी मारली आहे. प्रभाग पाचमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रीती सूर्यवंशी आणि भाजपचे माजी नगरसेवक अनिल बोदाडे यंदा आघाडीतून विजयी झाले आहेत.

प्रभाग सहामध्ये गौरीशंकर बुरकुल आणि मनीषा मेटकरी या भाजपकडून, तर प्रभाग सातमधून माजी नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे पती सोमनाथ माळी आणि अश्विनी धोत्रे ह्याही तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून विजयी झाल्या आहेत.

Mangalvedha Nagar Parishad Result
Shahajibapu's Reaction : सांगोल्याचा मतदार स्वाभिमान अन्‌ अभिमानाने वागला : नगरपालिकेतील विजयानंतर शहाजीबापूंची प्रतिक्रिया

प्रभाग आठमध्ये सावित्री कोंडुभैरी आणि सोमनाथ हुशारे भाजपकडून, तर प्रभाग नऊमध्ये तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रशांत गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरन्नुम पटेल, तर प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे पुन्हा विजयी झाले तर सीमा बुरजे या आघाडीकडून विजयी झाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com