Shahajibapu's Reaction : सांगोल्याचा मतदार स्वाभिमान अन्‌ अभिमानाने वागला : नगरपालिकेतील विजयानंतर शहाजीबापूंची प्रतिक्रिया

Sangola Nagar Parishad Result : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या विजयानंतर शहाजीबापू पाटील यांनी अचानक झालेल्या युतीला मतदारांनी नकार देत विकासाला कौल दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय युती मतदारांनी नाकारत शिवसेनेला मोठा कौल दिला.

  2. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा माने विजयी झाले असून 23 पैकी 15 जागांवर शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  3. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्याच्या मतदारांनी स्वाभिमानाने मतदान केल्याचे सांगत भाजपच्या राजकीय भूमिकेवर टीका केली.

Solapur, 21 December : सांगोल्यात अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाची युती मतदारांनी अमान्य केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली विकासाची घौडदौड सुरू आहे. त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. सांगोल्याचा मतदार हा स्वाभिमान आणि अभिमानाने वागला आहे, अशी प्रतिक्रिया नगरपरिषदेतील विजयानंतर शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय एकत्र आले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकाकी लढत दिली होती. मतदानाच्या एक दिवस अगोदर शहाजीबापू यांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे सांगोल्याची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चिला गेली होती.

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा माने हे विजयी झाले आहेत, नगरपरिषदेच्या 23 पैकी 15 जागांवर शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. शेकापचे 3, भाजपचे 4, दीपक साळुंखे यांच्या गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. त्यानंतर माजी आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगोल्याचा मतदार स्वाभिमानाने वागला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोला शहरातील मतदारांविषयी मला गर्व आणि अभिमान वाटत आहे. सांगोला तालुका हा (स्व.) गणपतराव देशमुख आणि मी गेली ६० ते ६५ वर्षे वैचारिक पातळीवर आम्ही आमचा मतदार तयार केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत केलेली युती ही सांगोल्याच्या मतदारांना आवडलेली नाही, हे निकालावरून दिसून येते. सांगोल्यात सर्वच पक्ष विरोधात होते. मात्र, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष युती झाली होती.

Shahajibapu Patil
Nagar Parishad Result : सोलापुरात भाजपला मोठा धक्का; अकरापैकी तीन ठिकाणी पराभव, चार जागांवर पिछाडीवर

राजकारणात चालेलं वेडंवाकडं वागणं, सांगोल्याच्या जनतेने अमान्य केले आहे. शिवसेनेला भरघोष मतदान केले. आमचे उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वासही शहाजी पाटील यांनी बोलून दाखवला.

ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत मला एकटं पाडण्यात आलं होतं. मात्र जनतेने मला साथ दिल्याचे निकालातून दिसून येत आहे. प्रचाराच्या वेळी मला ते जाणवत होतं की सर्वसामान्य जनता आपल्यासोबत आलेली आहे, त्यामुळे आमचे सर्व उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी होतील.

Shahajibapu Patil
Pune Politics : 'या' मनसे नेत्याच्या मदतीने सुप्रिया सुळे यांचा बारामती विजयाचा मार्ग होणार सुकर?

भाजपने शिवसेनेला विश्वासात घेऊन नगरपालिका निवडणुका लढवायला हव्या होत्या. कारण सोलापूर जिल्ह्याची परंपरा अशी आहे की, शिवसेना कधीच चुकीचं वागलं नव्हती. भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. मात्र, आम्हाला विचारात न घेता भाजपने ही निवडणूक लढवली होती, त्यामुळे भाजपला जिल्ह्यात धक्का बसल्याचे मानले जात असावे, असेही शहाजीबापू यांनी नमूद केले.

  1. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष कोण झाले? – शिवसेनेचे आनंदा माने नगराध्यक्षपदी विजयी झाले.

  2. या निवडणुकीत भाजपची भूमिका काय होती? – भाजपच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय युती उभी करण्यात आली होती.

  3. शहाजीबापू पाटील यांनी निकालावर काय प्रतिक्रिया दिली? – मतदारांनी स्वाभिमानाने मतदान करून चुकीच्या राजकारणाला नकार दिला, असे ते म्हणाले.

  4. या निकालाचा जिल्हा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? – भाजपला सोलापूर जिल्ह्यात राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com