Mangalvedha Politic's : परिचारकांच्या मदतीतून आमदार आवताडे उतराई होणार? मंगळवेढ्यात परिचारक समर्थकास सभापतिपदाची खुर्ची देणार

Samadhan Autade-Prashant Paricharak Politic's : आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा पंचायत समितीवर प्रथमच भाजपची सत्ता आली. महिला आरक्षित सभापतिपदासाठी कोणाला संधी मिळणार आणि Prashant Paricharak समर्थकांना स्थान मिळणार का याची चर्चा आहे.
Prashant Paricharak-Mohini Ganpatil-Samadhan Autade
Prashant Paricharak-Mohini Ganpatil-Samadhan AutadeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 09 March : मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा झेंडा प्रथमच फडकला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीही मागील २०१७ च्या निवडणुकीतही आवताडे गटानेच सत्ता जिंकली हेाती. त्यामुळे पंचायत समितीची आवताडेंकडे दुसऱ्यांदा सत्ता आली आहे. दरम्यान, मंगळवेढा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून आमदार आवताडे कोणाला संधी देतात, याची उत्सुकता आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभेला दोनदा केलेल्या मदतीची उतराई अद्याप पक्षनेतृत्वाकडून झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आमदार आवताडे परिचारकांच्या समर्थकाला सभापतिपद देण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणार का? याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

पुढील वर्षी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असल्याने परिचारक समर्थकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच, येत्या काही दिवसांतील घडामोडीही महत्वपूर्ण असणार आहेत. मागील निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी एकत्र येत संत दामाजी कारखान्यात आमदार आवताडेंना धूळ चारली होती.

नकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बहुतांश परिचारक समर्थकांनी आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवेढा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे बोराळे गणातील जयश्री कवचाळे, मरवडे गणातील मोहिनी गणपाटील, चोखामेळानगरमधून निवडून आलेल्या दीपाली ताड या तीन प्रमुख दावेदार आहेत, त्यामध्ये कुणाला सभापतिपदाचा मान मिळणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

वास्तविक, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांची स्वंतत्र ताकद आहे. मात्र, दोघे एकत्र आल्याशिवाय भाजपचा विजय अशक्य आहे, हे ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना पोटनिवडणुकीत एकत्र आणले आणि प्रबळ असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला.

Prashant Paricharak-Mohini Ganpatil-Samadhan Autade
Deputy Collector Letter Viral : उपजिल्हाधिकाऱ्याचे पत्र व्हायरल, सही ऐवजी अंगठा, सुट्टीही झाली मंजूर!

विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीतही भाजपने परिचारकांच्या मदतीचा पॅटर्न राबवला, त्यानंतर प्रशांत परिचारक यांचे तात्पुरते राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केला. परंतु त्याबद्दल अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. पण, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत हे भाजपचे हे दोन गट एकत्र आले होते. दामाजीनगर जिल्हा परिषद गट परिचारक समर्थकांना देण्यात आल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात मरोडी गणातून परिचारक समर्थक श्रीकांत गणपाटील यांच्या पत्नी मोहिनी गणपाटील यांनाच उमेदवारीची संधी दिली गेली, त्या पंचायत समितीवर निवडून आलेल्या एकमेव परिचारक समर्थक ठरल्या. मात्र, परिचारक गटातील अनेकांनी आमदार आवताडेंचे नेतृत्व मान्य केले.

विधानसभेला परिचारक समर्थकांच्या काही गावांत कमी मताधिक्य मिळाले. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे परिचारक समर्थकांनी विधानसभा निवडणुकीत दोन वेळा, तसेच नगरपालिका, झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत केलेल्या मदतीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी परिचारक समर्थकांना पंचायत समितीचे सभापतिपद देऊन उपसभापतिपद आपल्याकडे ठेवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जिल्हा परिषद गटातील दोन गावांत यापूर्वी प्रदीप खांडेकर आणि प्रेरणा मासाळ यांच्या रूपाने सभापतिपदाचा कार्यकाल मिळाला आहे. मात्र, या दोघांच्या कामाच्या जोरावर यंदा तो गट आमदार आवताडे यांच्या ताब्यात कामय राहिला आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय पायाभरणी करण्यासाठी आवताडे हे परिचारक समर्थकाला सभापतिपदाची संधी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Prashant Paricharak-Mohini Ganpatil-Samadhan Autade
sabapati election : सभापती-उपसभापती निवडीआधीच राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेचे वर्चस्व; शिंदेंच्या आदेशानुसार नावं अन् कार्यकाळ जाहीर

काॅंग्रेसमधून भाजपत आलेल्या जयश्री कवचाळे यादेखील सभापतिपदाच्या दावेदार आहेत. पूर्व भागातील जनाधार टिकवण्यासाठी त्यांनाही सत्तेत संधी देणार का ? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com