Samadhan Avtade : आमदारकीपेक्षा विधानसभा चालविण्याचा आनंद अविस्मरणीय होता; समाधान आवताडे

Assembly Speaker : पंढरपूर पोटनिवडणुकीतून प्रथमच निवडून आलेले आमदार समाधान आवताडे यांची मागील विधीमंडळ अधिवेशनात विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती.
Samadhan Avtade
Samadhan Avtade sarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 18 August : पहिल्यांदाच निवडून आल्यामुळे विधीमंडळ कामकाजाचा कोणताही अनुभव पाठीशी नव्हता. तरीही विधानसभेतील 288 आमदारांचे कामकाज तालिका अध्यक्ष म्हणून सुरळीतपणे चालविण्याचा क्षण माझ्या आयुष्यात आमदारकीपेक्षा अविस्मरणीय होता, असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

पंढरपूर पोटनिवडणुकीतून प्रथमच निवडून आलेले आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांची मागील विधीमंडळ अधिवेशनात विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षांच्या गैरहजेरीत हे तालिका अध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवतात. ही संधी यंदा आमदार समाधान आवताडे यांना मिळाली होती.

तालिका अध्यक्ष (Speaker) म्हणून विधानसभेचे (Assembly) कामकाज पाहण्याचा योग आला. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमदाराचे नाव समाधान असल्यामुळे विधानसभेतील सर्व सदस्यांचे समाधान होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. अजितदादांचा तो विश्वास सार्थ ठरविताना विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि कर्तव्याची जपणूक करत समयसूचकपणे सभागृहाचे कामकाज चालवले, असे आवताडे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज मंडळींच्या हमरीतुमरीवर योग्यवेळी मध्यस्थी करणे. सर्वच पक्षाच्या आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होता येईल, या दृष्टिकोनातून सर्वांना प्रश्न मांडण्याची संधी दिली. काही आमदारांनी अध्यक्ष आपणाला बोलण्याची कमी संधी देतात, असे आरोपही केले. मात्र, अनेक चांगल्या प्रश्नाला आणि नवोदित आमदारांना अधिकची संधी दिली. त्यामुळे अनेक दुर्लक्षित प्रश्नाला वाचा फोडता आली.

Samadhan Avtade
Samadhan Avtade : पंढरपूर पोटनिवडणुकीत उमेदवारी निश्चित कशी झाली?; आवताडेंनी सांगितली फडणवीसांसोबतच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रश्नाची तीव्रता अधिक होती, त्यामुळे त्यांना अधिकचा वेळ दिला. मुद्दा सोडून दुसऱ्याच मुद्द्यावर बोलणाऱ्या आमदारांचा वेळ कमी करूनही दाखवला. त्यामुळे तालिका अध्यक्ष म्हणून त्या कामाचे समाधान वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

आवताडे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मंगळवेढा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून शासकीय यंत्रणेच्या सोबतीला आम्ही स्वतंत्र यंत्रणा लावून यामध्ये अधिक महिलांना कसा लाभ देता येईल, याचे नियोजन केले, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक महिला पात्र ठरल्याचा आनंद आहे.

Samadhan Avtade
Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी दीपक साळुंखेंना डिवचले; ‘मला मैदान सोडायची सवय नाही, निवडणूक ताकदीने लढणार’

गेली अनेक वर्ष राजकीय व्यासपीठावर चर्चेचा विषय झालेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आपल्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता घेऊन निविदा प्रक्रियेपर्यंत मार्गी लावली, याचं समाधान या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून लाभले, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com