आमदार संग्राम जगतापांनी शब्द पाळला : कुमार वाकळे झाले 'स्थायी'चे सभापती

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांचा शब्द चालतो.
Kumar Wakale
Kumar WakaleLahu Dalvi
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. महापौरपद शिवसेनेकडे आहे. असे असताना महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांचा शब्द चालतो. याचा प्रत्यय महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत आज आला.

अहमदनगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2019ला झाली. या निवडणुकीनंतर महापालिकेत नेहमीच्या राजकीय समीकरणांना छेद देत आमदार संग्राम जगताप यांनी काही राजकीय डाव खेळले. यात सुरवातीला भाजप बरोबर तर आता शिवसेने बरोबर जात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. मात्र शहरातील या सत्ताकारणाच्या किल्ल्या भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले व त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांच्याच खिश्यात राहिल्या आहेत.

Kumar Wakale
त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यावर स्थायी समितीचे सभापतीपद हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले. 2019ला आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व बसप अशी चार पक्षांची मोट बांधली आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. त्यावेळच्या पदांच्या वाटाघाटीत स्थायी समितीचे सभापतीपद एक वर्षांसाठी बसपला देण्याचे ठरले. त्यानुसार मुदस्सर शेख हे स्थायी समितीचे सभापती झाले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यावर स्थायी समितीचे आठ सदस्यपद चिठ्ठी टाकून निवृत्त करण्यात आले. मात्र यात मुदस्सर शेख यांचे नाव नसल्याने प्रशासकीय पेच निर्माण झाला. त्यांनी सुमारे दीड वर्षे स्थायी समितीचे सभापतीपदी काम पाहिले. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली होती.

भाजपला स्थायी समितीचे सभापतीपद हवे होते. मात्र राज्यात महाविकास आघाडी असल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसला भाजप नगरसेवकाला सभापतीपद देता येत नव्हते. आमदार संग्राम जगताप यांनी मास्टर स्ट्रोक खेळत भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांचा राष्ट्रवादीत तात्पूर्ता प्रवेश दाखवला. त्यामुळे मनोज कोतकर हे राष्ट्रवादीची उमेदवारी करत स्थायीचे सभापती झाले. मनोज कोतकर हे जरी भाजपचे नगरसेवक असले तरी आमदार संग्राम जगताप यांचे निष्ठावान समजले जातात. सहा महिन्यानंतर पुन्हा स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आली. आता मात्र ठरल्या प्रमाणे राष्ट्रवादीला सभापतीपदाची संधी होती. राज्यात महाविकास आघाडी असल्याने शिवसेनेचा अडसर येण्याची चिन्हेही कमी होती.

Kumar Wakale
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुमार वाकळे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आमदार जगताप यांनी अविनाश घुले यांना सभापती करण्याचे ठरविले. कुमार वाकळे नाराज होऊ नये यासाठी त्यांना पुढच्या वेळी सभापती करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार यंदाच्या स्थायी समितीच्या नूतन सदस्य निवडीत मुदस्सर शेख यांच्या सभापती पदाचा कार्यकाळासारखा पुन्हा प्रशासकीय पेच निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली गेली. आमदार जगताप यांच्या सांगण्यावरून अविनाश घुले यांनी पदाचा व स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि कुमार वाकळे यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

Kumar Wakale
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

कुमार वाकळे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाली त्याच वेळी आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या वर्षी दिलेला शब्द पाळला अशी चर्चा अहमदनगर शहरात रंगली होती. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुमार वाकळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. दुसरा कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने कुमार वाकळे हे स्थायी समितीचे सभापती झाले आहेत. उद्या ( ता. 18 ) जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे कुमार वाकळे यांची स्थायी समिती सभापती निवड झाल्याची औपचारिक घोषणा करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com