महापालिका कामगारांच्या मदतीला आमदार संग्राम जगताप धावले : महापालिका आयुक्त, उपायुक्तांनी फिरविली पाठ

अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांनी पुढाकार घेतला आहे.
Aditi Tatakare, Sangram Jagtap, Anand waykar, Babasaheb Mudgal and Anant Lokhande
Aditi Tatakare, Sangram Jagtap, Anand waykar, Babasaheb Mudgal and Anant LokhandeSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर महापालिका कर्मचारी हे विविध 12 मागण्यांसाठी मागील 11 दिवसांपासून महापालिकेसमोर धरणे आंदोलन करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अहमदनगर महापालिका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईत विविध मंत्र्यांना भेटी घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ( MLA Sangram Jagtap rushed to the aid of NMC workers: Lessons turned by Municipal Commissioner, Deputy Commissioner )

अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने 12 मागण्यांसाठी महापालिकेत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज 11 वा दिवस होता. या 12 मागण्यांपैकी 9 मागण्या महापालिकेने मान्य केल्या आहेत. यातील तीन मागण्या राज्य सरकारकडून सोडवाव्या लागणार आहेत. अहमदनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, महापालिकेतील 305 व 506 अंतर्गत सफाई कामगारांचे लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने सामावून घेण्यात यावे, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपये अनुदान मिळावे अशा या तीन मागण्या आहेत.

Aditi Tatakare, Sangram Jagtap, Anand waykar, Babasaheb Mudgal and Anant Lokhande
एसटी कर्मचाऱ्यांसाठी संग्राम जगताप यांचे अनिल परबांना साकडे

या तीन मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याचे आश्वास महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिले होते. आमदार संग्राम जगताप यांनीही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल मुंबईत गेले होते. महापालिका आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगेही मुंबईत गेले होते. कामगार संघटनेतील पदाधिकारी मंत्रालयात आयुक्त गोरे व उपायुक्त डांगे यांची बराच वेळ वाट पाहिली मात्र ते मंत्रालयात फिरकटलेही नाहीत.

Aditi Tatakare, Sangram Jagtap, Anand waykar, Babasaheb Mudgal and Anant Lokhande
नगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाने प्रशासनासमोर वाढविला पेच

आमदार संग्राम जगताप यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली. महापालिकेतील 506 व 305 सफाई कामगाराच्या वारस नेमणुकी संदर्भातील फाईल नगरविकास विभागाने अभिप्रायासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविली आहे. महापालिकेतील सफाई कामगारांचा हा प्रश्न सोडवावा अशी विनंती आमदार जगताप यांनी मंत्री तटकरे यांना केली. मंत्री तटकरे यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आमदार जगताप हे उद्या ( ता. 11) या शिष्टमंडळाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेणार आहेत. मंत्री शिंदे यांच्याकडे महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात येईल.

Aditi Tatakare, Sangram Jagtap, Anand waykar, Babasaheb Mudgal and Anant Lokhande
त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले

गोरे व डांगेचा निषेध

महापालिका कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत गेलेल्या महापालिका आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांनी मंत्रालयात न येता वैयक्तिक कामे केली, असा आरोप करत अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने आयुक्त गोरे व उपायुक्त डांगे यांचा निषेध केला आहे. या दोघांच्या विरोधात उद्या ( ता. 11 ) सकाळी 11 वाजता महापालिका गेटवर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Aditi Tatakare, Sangram Jagtap, Anand waykar, Babasaheb Mudgal and Anant Lokhande
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

अहमदनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. त्यांचे प्रश्न सुटले तरच ते शहरात चांगले काम करू शकतील. त्यादृष्टीने महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या प्रयत्नांना यश येईल.

- आमदार संग्राम जगताप.

महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटले तर त्याचे श्रेय कामगार संघटने बरोबरच आमदार संग्राम जगताप यांचेही राहील. या प्रलंबित मागण्यासाठी महापालिका कामगार संघटना 2017 पासून प्रयत्न करत आहे. हे प्रश्न सुटल्यास महापालिकेला 450 सफाई कामगार मिळतील. यातून वाढते अहमदनगर शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल.

- अनंत लोखंडे, अध्यक्ष, अहमदनगर महापालिका कामगार संघटना.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com