Leader Of Opposition News : संग्राम थोपटेंचा विरोधी पक्षनेतेपदासाठी शड्डू; काँग्रेस हायकमांडला पाठविले ३० आमदारांच्या सह्यांचे पत्र

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे.
Sangram Thopte
Sangram ThopteSarkarnama

Maharashtra Politic's : विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. अनेक मातब्बर नेत्यांनी या पदासाठी फिल्डिंग लावली आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनीही विरोधी पक्षनेतेपदासाठी शड्डू ठोकला आहे. तब्बल ३० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून त्यांच्या सह्यांचे पत्र त्यांनी काँग्रस हायकमांडला पाठविले आहे. (MLA Sangram Thopte's letter to Congress High Command for the post of Leader of Opposition)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडे (Congress) सर्वाधिक ४५ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे जाणार, हे निश्चित आहे. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी नेहमीप्रमाणे चुरस पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचाही समावेश होता. मात्र, ही नावे आता मागे पडली आहेत.

Sangram Thopte
Assembly Session : मुंडे-रोहित पवारांमध्ये चकमक; ‘कृषीमंत्र्यांची जबाबदारी कशी मिळाली?, तुम्हाला कर्जत-जामखेडमध्ये मिळाली तशी..'

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आता दुसऱ्या फळीतील नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यात विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची नाव पुढे आली आहेत. पण, काँग्रेस हायकमांडने अजून कोणालाही आपला कल दर्शविलेला नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेते कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Sangram Thopte
Assembly Session : जयंत पाटलांच्या ‘त्या’ शहाणपणाच्या विधानामुळे आरआर आबांचा आत्मा दुःखी होत असेल; मुनगंटीवारांचा पलटवार

दरम्यान, भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) हेही विरोधी पक्षनेते होण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी तर थेट काँग्रेस हायकमांडला आपल्या तीस आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर तीस आमदारांच्या सह्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे.

Sangram Thopte
Solapur Loksabha : अजितदादांच्या साथीमुळे भाजप ‘प्लस’मध्ये; पण काँग्रेस प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघातील गणित सोडवणार का?

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही थोपटे यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आमदाराबरोबरच्या भांडणात त्यांचे मंत्रिपद हुकले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. पण, शेवटपर्यंत त्यांच्या पदारात सत्तेचे कोणतेही पद पडले नव्हते. त्यामुळे थोपटे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com