Assembly Session : मुंडे-रोहित पवारांमध्ये चकमक; ‘कृषीमंत्र्यांची जबाबदारी कशी मिळाली?, तुम्हाला कर्जत-जामखेडमध्ये मिळाली तशी..'

गोरंट्यालसाहेब. आमचं भांडण बघत बघत तुमचं कधी काय होईल सांगता येणार नाही, असा इशाराच मुंडे यांनी दिला.
Rohit Pawar-Dhananjay Munde
Rohit Pawar-Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाचे नेते आमने सामने आलेच. कृषी विभागाच्या प्रस्तावरील चर्चेला उत्तर देतानाच पहिल्या पाच मिनिटांतच कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार यांच्यात चकमक झाली. (Clash between Dhananjay Munde-Rohit Pawar)

किरण लहामटे यांनी मांडलेल्या कृषी विभागाच्या प्रस्तावार अनेक सदस्यांनी मते व्यक्त केली. अनेकांनी प्रस्तावाच्या बाजूने, प्रस्तावातील अनेक गोष्टी मनातून मान्य असतानाही विरोध दर्शविला. जे आमदार बोलत असताना सुनील भुसारा यांचे नाव घेत त्यांना रोहितदादांनी कसे सोडले माहिती नाही, असा टोमणा कृषीमंत्र्यांनी लगावला.

Rohit Pawar-Dhananjay Munde
Solapur Loksabha : अजितदादांच्या साथीमुळे भाजप ‘प्लस’मध्ये; पण काँग्रेस प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघातील गणित सोडवणार का?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की, कधी कुणावर काय जबाबदारी येईल, याचा नेम सांगता येत नाही. तेवढ्यात विरोधी बाकावरून आमदार रोहित पवार यांनी जबाबदारी ‘कशी’ आली, असा सवाल केला. त्यावर मुंडे यांनी ‘आता कशी?, जशी तुम्हाला कर्जत -जामखेड मतदारसंघात मिळाली तशी,’ असे उत्तर दिले. पुन्हा रोहित पवारांनी (Rohit Pawar) लोकशाहीच्या माध्यमातून असे पुन्हा सवाल केला. ती लोकशाही आपल्याला सोयीची आहे. लोकशाहीची व्याख्या कधीतरी आपल्याला एकट्याला भेटून सांगेन. ती सार्वजनिक सभागृहात सांगणे उचित नाही. तेवढ्यात गोरंट्याल यांनी भांडण लागलं, असे विधान केले. त्यावर आमचं भांडणं लागणार नाही, गोरंट्यालसाहेब. आमचं भांडण बघत बघत तुमचं कधी काय होईल सांगता येणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

Rohit Pawar-Dhananjay Munde
Assembly Session : जयंत पाटलांच्या ‘त्या’ शहाणपणाच्या विधानामुळे आरआर आबांचा आत्मा दुःखी होत असेल; मुनगंटीवारांचा पलटवार

कृषी विभागाच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या चर्चेकडे होते. जेवढे चर्चेकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते, तेवढीच उत्ंकठा सरकारकडून उत्तर काय येतेय याकडेही सर्वांच्या नजरा हेात्या. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. काहींनी विधायक सूचना केल्या, काहींनी टीकाही केली. काही जबाबदार सदस्यांनीही टीका केली. स्वाभाविक आहेच की विरोधी बाकावर बसल्यावर ते ‘अंगात येतं’च, असा टोला मुंडे यांनी प्रस्तावाला विरोध करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांना लगावला.

Rohit Pawar-Dhananjay Munde
Kharghar Incident In Assembly : असा हा कोण शहाणा आहे? ‘त्या’ मृत्यूला तो शहाणा जबाबदार ठरवा; जयंत पाटील कडाडले

तेवढ्यात विरोधी बाकावरून अनुभव..अनुभव असा आवाज झाला. विरोधी बाकावर असताना अंगात येतं आणि सत्ताधारी बाकावर गेल्यावर काय अनुभव येतो का, असा सवाल काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. त्याला मुंडे यांनी ‘त्यावरही मी बोलतो,’ असे उत्तर दिले. ‘द्या, आम्ही ऐकलाच बसलोय, असे प्रतिप्रश्न केला. त्यावर इथं देतो, गोरंट्याल साहेब, माय डियर फ्रेंड. आपण म्हणाल त्या ठिकाणी मी उत्तर देतो. ही तळमळ सभागृहातील प्रत्येक सदस्याची आहे. सर्वांनी शेतकरीहिताची गोष्ट केली आहे, असेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com