Shahajibapu Patil News : करोडो रुपयांचा निधी आणतोय असं सांगणाऱ्या शहाजीबापूंच्या सांगोल्यात ठाकरेंच्या शिलेदाराकडून पाण्याचा टॅंकर !

Sangola Political News : सांगोला मतदारसंघातील चिकमहुद या गावात पाणीटंचाईनं डोकं वर काढलं आहे.
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangola : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आणि त्यांच्या ताकदीचा पूर्णपणे वापर करत कोट्यवधींची विकासकामे मतदारसंघात आणल्याचा दावा करणारे, जाहीरपणे सरकार दरबारातून आणलेल्या निधींचा थेट आकडा सांगणारे आणि भरसभेत भाषणं ठोकणाऱ्या सांगोल्याचे शिवसेने(शिंदे गट) आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, ठाकरेंच्या युवासेनेच्या शिलेदाराने स्वखर्चातून पाण्याचा टॅंकर सुरु केला आहे.

'काय झाडी काय डोंगर..'' या डायलॉगुळे महाराष्ट्राला माहीत झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंनी महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नसल्याचा आरोप केला होता. मात्र, राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा ते करतात. तसेच मतदारसंघात वेगाने विकासकामांचा धडाका सुरु असल्याचंही ते ठामपणे सांगतात. पण याचवेळी शहाजीबापू यांचे घर असलेल्या चिकमहुद या गावात ऐन पावसाळ्यात तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ठाकरे गटा(Shivsena UBT) च्या युवासेनेकडून हा दावा करण्यात आला आहे.

Shahajibapu Patil
Tukaram Munde Transfer : तुकाराम मुंडे आता धनंजय मुंडेंच्या खात्यात; दोन्ही मुंडेंची साथ टिकणार का ?

सांगोला मतदारसंघातील चिकमहुद या गावात पाणीटंचाईनं डोकं वर काढलं आहे. गावातील स्थानिक पुरुषांसह महिलांना पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. त्याचमुळे नागरिकांची तहान भागवण्यासाठी ठाकरे गटाच्या युवासेनेनं पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वखर्चातून गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला असल्याचा दावा केला आहे.

युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले हे स्वखर्चाने चिकमहुद येथे टँकरने पाणीपुरवठा करत गावाची तहान भागवत आहेत. सध्या तरी सोलापूर जिल्ह्याला पावसाने ओढ दिल्याने सांगोला तालुक्यातील इटकी येथे पहिला सरकारी टँकर सुरू झाला आहे. मतदारसंघाच्या विकासाच्या गप्पा मारणारे आमदार शहाजीबापू आता यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे.

Shahajibapu Patil
Monsoon Session 2023 : उत्तम बोलतो तो नेक आहे, धनंजय मुंडे, हे सर्वांमध्ये एक आहे; नरेंद्र दराडेंनी घेतल्या टाळ्या…

मागील वर्षी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदें(Eknath Shinde)च्या नेतृत्वात शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करून थेट गुवाहाटी गाठली होती. त्यात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे पहिल्या गाडीत होते. तिथे काय झाडी काय डोंगार सगळं कसं एकदम ओक्के मदी हाय.. हा डॉयलॉग चांगलाच गाजला होता. त्यावेळी शिंदे गटातील सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय केला अशी तक्रार केली होती‌. त्यात शहाजीबापूही आघाडीवर होते. त्यामुळे मतदारसंघात विकासकामे पूर्ण करताना अडचणी येत असल्याचं म्हटले होते.

मात्र, आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aaghadi Government)च्या कामांना स्थगिती देतानाच शिंदे गटातील आमदारांना भरघोस निधींचे वाटप करण्यात आले होते. त्यात शहाजीबापूंनीही आघाडी सरकारमधील निधीची कसर भरून काढतानाच कोट्यवधींचा निधी मतदारसंघात आणल्याचा दावा केला होता.

Shahajibapu Patil
Shirur News : उपसरपंचांचा राजीनामा मंजूर करून निवडणूक न घेणे भोवले; सरपंचपद गमावले...

अजित पवारांच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे बापूंचा 'यू-टर्न''

काही महिन्यांपूर्वी अजित पवारांवर निधी वाटपात दुजाभाव केल्याचा ठपका ठेवणारे शिवसेनेच्या आमदारांनी ठेवत सडकून टीका केली होती. मात्र, अजितदादांच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील एन्ट्रीमुळे शिवसेनेच्या आमदारांची भूमिका मवाळ झाली आहे‌.

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील(ShahajiBapu Patil) यांनी त्यावेळी अजित पवारांवर निधी वाटपात अन्याय केल्याची तक्रार केली होती. मात्र, आता त्यांनीअजित पवारांचे तोंडभरून कौतुक करत आपल्या आधीच्या भूमिकेपासून यू-टर्न घेतला आहे. गणपतराव देशमुख आमदार असताना सांगोला उपसा जलसिंचन योजनेसाठी दरवर्षी फक्त एक लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली जायची. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात अजित पवार अर्थमंत्री असताना माझ्या शब्दाखातर एका मिनिटात २० कोटी रूपयांची तरतूद केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com