Shirur News : उपसरपंचांचा राजीनामा मंजूर करून निवडणूक न घेणे भोवले; सरपंचपद गमावले...

विभागाय आयुक्तांच्या विरोधात मी ग्रामविकासमंत्री आणि न्यायालयात दाद मागणार आहे.
Alka Shendge
Alka ShendgeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपसरपंचाने दिलेला राजीनामा मंजूर न करणे आणि उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यास टाळाटाळ करणे, शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील सरपंचांना चांगलेच भोवले आहे. कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सरपंच अलका बिरा शेंडगे यांना पदच्युत केले आहे. त्याबाबतचा आदेश राव यांनी आज दिला आहे. (Sarpanchship was lost due to non-acceptance of the resignation of the Deputy Sarpanch)

इतर ग्रामपंचायत सदस्याला उपसरपंचदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी उपसरपंच कविता बिडगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सरपंच (Sarpanch) अलका बिरा शेंडगे यांनी तो राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ केली हेाती. त्यामागे राजकीय द्वेष असल्याचा आरोप विरोधी गटाकडून करण्यात आला होता.

Alka Shendge
Siddheshwar's Chimney in Assembly session' : चिमणीबाबत मला माहिती नाही'; प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर गुलाबरावांच्या मदतीला धावले सुभाष देशमुख

उपसरपंचांचा राजीनामा स्वीकारून त्या पदाची निवडणूक घेण्याचे सरपंच टाळत आहेत. ते आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत, अशी तक्रार माजी सरपंच कमल कोकडे, रेणुका मारणे, कविता बिडगर, विजया भोंडवे, संध्या कदम,उत्तम कदम,तात्याबा शेंडगे, सुभाष कोकडे, समीर कोरेकर आदी नऊ सदस्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती.

Alka Shendge
Assembly Session : आदित्य ठाकरे-गुलाबराव भिडले; ‘मंत्र्यांचा अभ्यास पक्का असावा नाही तर टिंगल होते; ठाकरे फार अभ्यास करून आलेत’

दरम्यान, उपसरपचांनी नियमानुसार सरपंचांकडे राजीनामा द्यावा लागतो, त्यानुसार बिडगर यांनी आपला राजीनामा शेंडगे यांच्याकडे दिला होता. तो त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये पडताळणीला ठेवून तो मंजूर करावा लागतो. त्यासंबंधीचा अहवाल गटविकास आणि तहसीलदार यांनाही देणे आवश्यक आहे. मात्र, सरपंच शेंडगे यांनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. राजकीय द्वेषापोटी त्यांनी सरपचंपदाच्या जबाबदारी पाळली नाही, त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे, असे विभागीय आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटलेले आहे.

Alka Shendge
Girish Chaudhary Granted Bail: खडसे कुटुंबीयांना मोठा दिलासा; जावई गिरीश चौधरींना दीड वर्षानंतर जामीन मंजूर

याबाबत सरपंच अलका शेंडगे म्हणाल्या की, उपसरपंच कविता बिडगर यांनी नुमन्यात आणि कायदेशीरदृष्टया राजीनामा दिलेला नाही. याबाबत मी त्यांना वारंवार जाणीव करून दिलेली आहे. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याउलट विभागीय आयुक्तांकडे माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने तक्रार करण्यात आली आहे. विभागाय आयुक्तांच्या विरोधात मी ग्रामविकासमंत्री आणि न्यायालयात दाद मागणार आहे, असेही सरपंचांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com